Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२६

*गणेशोत्सवापूर्वी सांगली पोलिसांचा दणका; तिघे तडीपार*

 

 वैशाली रामचंद्र धुमाळ, कोमल रामचंद्र धुमाळ व अमित रामचंद्र धुमाळ 


प्रा. डॉ. प्रभाकर माने  : मुख्य संपादक 


सांगली : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोठी कारवाई केली. कोमल रामचंद्र धुमाळ, अमित रामचंद्र धुमाळ आणि वैशाली रामचंद्र धुमाळ या तिघांना दोन वर्षांसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले.

       पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५५ अन्वये हा आदेश जारी केला. २०२२ ते २०२५ दरम्यान या टोळीविरुद्ध खाजगी सावकारी, खंडणी, अपहरण, मारहाण, जिवे मारण्याची धमकी, घातक हत्याराने हल्ला यांसह गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

      गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढावी, यासाठी ही कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा