Breaking

शुक्रवार, २८ मे, २०२१

अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

     मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये बोलताना दहावीचा निकाल जूनअखेर पर्यंत लावण्यात येईल असे सांगितले.

अकरावी प्रवेशाबाबत,

अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. यानंतर कनिष्ट महाविद्यालयांकडे ज्या जागा रिक्त राहतील त्या जागावंर जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत त्यांना प्रवेश देण्यात येईल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्यातील विविध बोर्डांंच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धती वेगळ्या असल्यानं अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.


बारावी परीक्षेसंदर्भात काय निर्णय?

बारावी परीक्षेसंदर्भात सीबीएसईसोबत चर्चा करत आहोत. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच आरोग्य आणि सुरक्षा ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे. केंद्रानं लसीकरणासाठी पुढाकार घेतला पाहिजे.  सीबीएसई बोर्डाचे महाराष्ट्रातील 25 हजार विद्यार्थी  आणि राज्य मंडळाचे 14 लाख विद्यार्थी आहेत. त्यांची सुरक्षा लक्षात घेणं महत्वाचं आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा