नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook, Twitter, WhatsApp आणि Instagram उद्यापासून (२६ मे) भारतात बंद होऊ शकतात. केंद्र सरकारने आणलेली नवीन मार्गदर्शक तत्व लागू न केल्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली जाईल. केंद्र सरकारने नवीन नियमावलीला मंजूरी देण्यासाठी दिलेली अंतिम तारीख आज समाप्त होत आहे. अशात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर २६ मे २०२१ पासून निर्बंध लागू होतील.
Facebook काय म्हणाले ?
डेडलाइन समाप्त होण्याआधी फेसबुकने निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे. सरकारच्या नवीन नियमांचा आम्ही सन्मान करतो. सोबतच, या नियमांच्या अंमलबजावणीच्या दिशेने काम करत आहोत. फेसबुकने नवीन नियम लागू करण्यासाठी सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे. तर ट्विटरने नवीन नियमांच्या अंमलबजावणीसाठी ६ महिन्यांचा कालावधी मागितला आहे.
केंद्र सरकारने ३ महिन्यांपूर्वी जारी केली होती नियमावली
केंद्र सरकारने या वर्षी फेब्रुवरी महिन्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केले होती. त्यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून नवीन नियम लागू करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावदी देण्यात आला होता. ट्विटरचे इंडियन व्हर्जन असलेले Koo हा एक मात्र प्लॅटफॉर्म आहे, ज्याने नवीन नियमांची अंमलबजावणी केली आहे. जर कंपन्यांनी या नियमांना लागू केले नाही तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
काय आहे नियमावली ?
- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला भारतात नोडल अधिकारी, तक्रारींसाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल, जे भारतात असणे आवश्यक आहेत. हे अधिकारी १५ दिवसांच्या आत ओटीटी कॉन्टेंटविरोधात आलेल्या तक्रारींचे निवारण करतील.
- नियमांनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला एक मासिक हवाल जारी करावा लागेल, ज्यात तक्रार आणि त्यांच्या निवारणाबद्दल माहिती असेल. सोबत कोणत्या पोस्ट आणि कॉन्टेंटला हटवले व याचे कारण काय होते, याबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा भारतातील पत्ता असणे गरजेचे आहे, जो कंपनीच्या मोबाइल अॅप आणि वेबसाइटवर नमूद असेल.
- नियमांनुसार, तक्रारीच्या २४ तासांच्या आत इंटरनेटवर आपत्तीजनक कॉन्टेंट काढून टाकावा लागेल. याशिवाय कंपन्यांना तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विशेष प्रक्रिया आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. २४ तासात तक्रार नोंदवली जाईल व १५ दिवसात त्याचे निवारण करावे लागेल.
Nice information, mentioned in short!
उत्तर द्याहटवा