मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
राज्यातील सर्व पत्रकारांचे रजिस्ट्रेशन करावे अशी मागणी 'नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र संघटनेचे' कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष सामंत यांचे नेतृत्वाखाली राज्याचे ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली आहे. या संघटनेचे राज्य अध्यक्ष शीतल करदेकर यांचे नेतृत्वाखाली ही महत्वपूर्ण भूमिका राज्य पातळीवर संघटनेने लावून धरली असून महाराष्ट्रातील जिल्ह्यातूनही या मागणीस पाठबळ मिळत आहे. तसेच देशपातळीवर एनयुजे इंडियाने पत्रकार रजिस्ट्रेशन या महत्वपूर्ण विषय ऐरणीवर आणला आहे.
भारतीय लोकशाहीचा चौथा मानबिंदू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते अशा पत्रकार क्षेत्रातील पत्रकार बंधू व कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने व रोजंदारीवर काम करीत आहेत. याचा परिणाम म्हणून किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करणे ही सोयीस्करपणे टाळले जात आहे.या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मा. कामगार मंत्री महोदयांना एनयुजेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.डॉ.सुभाष सामंत यांच्या नेतृत्वाखाली मागणीच्या निवेदन देण्यात आले आहे.
प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या बहुतेक पत्रकार व कर्मचाऱ्यांना नियुक्त करताना त्यांच्याकडून राजीनामाही घेतला जातो. मात्र नियुक्ती किंवा अन्य कागदाच्या छायांकित प्रती संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या जात नाहीत. कायद्याच्या पळवाटा शोधून त्यांचे परावलंबन करूनच नियुक्त्या केल्या जातात. परिणामी बहुतेक पत्रकार व अन्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने व रोजंदारीवर काम करावे लागते हे या देशाच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे व वाईट आहे. सर्वात सर्वात महत्त्वाचे असे की, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करणेही सोयीस्करपणे टाळली जात आहे. मुळात श्रमिक पत्रकार हे आर्थिक विवंचनेस तोंड देत असताना त्यांना मानसिक तणाव, मेंदू व हृदयाचे विकार अशा समस्यांना सामोरे जात असून श्रमिक पत्रकार व अन्य सर्वच प्रसारमाध्यमातील कर्मचारी बिकट अवस्थेतून जीवन जगत आहेत अशा प्रकारचा आशय निवेदनात नमूद केला असून, या सर्व घटकांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळाचे गठन करावे अशी मागणी एनयुजे महाराष्ट्रचे मार्गदर्शक शिवेंद्रकुमारजी,राज्याध्यक्षा शीतलताई करदेकर,व संघटन सचिव कैलास उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने केली आहे.
माध्यमकर्मीसाठी निश्चित धोरण आखण्याबाबत पुढीलप्रमाणे अपेक्षा कळविण्यात आल्या आहेत. १. आर्थिक सुरक्षा, आरोग्य सुरक्षा, नोकरी सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा याबाबत विचार होईल. २.दोन्ही बाजूनी सुसंवाद साधण्यासाठीचे एक व्यासपीठ तयार होईल. ३.महाराष्ट्र सरकारने मा.शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सव समिती केली आहे. त्याच नावे हे महामंडळ झाल्यास उत्तम होईल. ४. महामंडळाच्या कार्यक्षेत्रात पत्रकारांचे रजिस्ट्रेशन करणे, नियंत्रण व सुधारणा करणे अशी कामे यावीत. जेणेकरुन महाराष्ट्रातील हजारो श्रमिक पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी वर्गाला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आणि सहकार्याचा थेट लाभ घेता येईल आणि महाराष्ट्रातील हजारो मध्यमकर्मीयांना दिलासा मिळेल.
या निवेदनानंतर राज्याचे मा.कामगार मंत्री हसन मुश्रीफ साहेब याबाबत सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास श्रमिक पत्रकार व्यक्त करीत असून शासनाच्या आदेशाकडे लक्ष लागले आहे.
या निवेदनावर डॉ.सुभाष सामंत यांच्यासह कोल्हापूर जिल्हा सचिव शेखर धोंगडे, जिल्हा उपाध्यक्ष विनयकुमार पाटील, खजिनदार भूपेश कुंभार,हातकणंगले तालुका उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे,कुबेर हंकारे,पत्रकार भारत जमणे,सागर जमणे,अमरराजे जगदाळे व समीर कटके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सर्व प्रसार माध्यमकर्मीचे या निर्णयाकडे लक्ष असून त्यांच्या हितार्थ निर्णय होईल तसेच त्यांना हक्क प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा