Breaking

मंगळवार, २५ मे, २०२१

"कै.गोविंद बंडु आवळे सोशल फौडेशनच्या वतीने तेरवाड मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप"

 



जीवन आवळे : प्रमुख प्रतिनिधी 

         शिरोळ तालुक्यातील तेरवाड हे गाव एक टेकडीवर वसले आहे. या गावात गेल्या दोन वर्षांपासून कै.गोविंद बंडु आवळे सोशल फौडेशनच्या वतीने तेरवाड मधील सर्व नागरिकांना मोठा दिलासा व मदत मिळत आहे.

      महापूर असो वा कोरोना सारखी महामारी, ईद असो वा दिवाळी प्रत्येक सणामध्ये तसेच प्रत्येकाच्या अडीअडचणीला मदतीला धावून जाणारे हे सोशल फौडेशन आहे. या फौंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांची कामे मार्गी लागली आहेत. तसेच पाण्याची अडचणी निर्माण झाली त्या वेळी या फौडेशनच्या माध्यमातून लोकांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. तसेच पिण्यासाठी शुद्ध पेयजल पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली. वयोवृद्ध असो किंवा गरीब सर्वांना घरगुती साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.या फौडेशनच्या अध्यक्षा सौ.सारिका उमेश आवळे यांनी गेल्या वर्षी अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त फ्रंट लाईन वर्कर्स ५० लोकांना कोरोना योद्धा म्हणुन सन्मानित करण्यात आले होते. तसेच  महिला दिनानिमित्त गावातील प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा देखील सन्मान करण्यात आला होता.  

        कै.गोविंद बंडु आवळे सोशल फौडेशनचे पदाधिकारी मा.श्री.उमेश गोविंद आवळे यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत चांगल्या कार्याची सुरुवात केली व फौडेशनची निर्मिती केली. या फौडैशनच्या माध्यमातून ह्या वर्षी देखील कोरोना महामारी पासून लोकांना सुरक्षित करावे यासाठी जवळ जवळ ४०० कुटूंबातील लोकांना मास्क,सँनिटायझर तसेच प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी औषध पुरवण्यात आली. तेरवाड मधील नुतन ग्रामपंचायत सदस्य श्रीमती शोभा गोविंद आवळे यांची नात व मा. श्री. उमेश गोविंद आवळे यांची मुलगी कुमारी प्रार्थना उमेश आवळे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेरवाड मधील वडर वस्ती येथील कुटूंबातील सर्व लोकांना मास्क व सँनिटायझरचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.संतोष भुयेकर व मा. विनायक खटावकर साहेब उपस्थित होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष गोंधळी, बाबु वडर, शिवाजीराव खोत व आर्यन्स ग्रपचे अध्यक्ष मा. स्वप्निल माळी तसेच पदाधिकारी मा.उमेश गोविंद आवळे उपस्थित होते.

        या फौडैशनच्या सामाजिक संवेदनशीलतेचा सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा