जिल्ह्यात शनिवार ( दि.15) रात्री पासून कडक लॉकडाउन लागू केला आहे. तेव्हा या काळात जर कोणी विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळला तर संबंधित घटकावर खटले दाखल करून त्यांची रवानगी थेट जेल मध्ये करण्याचा इशारा कोल्हापूर चे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, परंतु संचार बंदीच्या काळात वारंवार सांगूनही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने ही भूमिका घेतल्याचे त्यांची सांगितले.
सध्याचा काळ कठीण आहे, तेव्हा घरी राहून प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा