प्रा.मेहबूब मुजावर/ प्रमुख प्रतिनिधी:
शिरोळ तालुक्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव सातत्याने वाढत चाललेला आहे. अशावेळी नागरिकाकडून अक्षय तृतीया,रमजान ईद,महात्मा बसवेश्वर व छत्रपती संभाजी महाराज जयंती सर्वत्र कोरोना नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
मुळात हिंदू धर्मीयासाठी अक्षय तृतीया हा सर्वात महत्त्वाचा मुहूर्त व मुस्लिम बांधवांसाठी रमजान हा पवित्र महिना रमजान ईदच्या रूपात हे दोन्ही सण मोठ्या थाटामाटात साजरे केले जात असतात. तसेच लिंगायत समाजबांधवांची बसवेश्वर जयंती व छ. संभाजी जयंती ही मिरवणुकीच्या माध्यमातून साजरी केली जात असते.
परंतु कोरोना महामारीने अख्ख्या महाराष्ट्रात किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यात घातलेले थैमान पाहता व कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी शासनाच्या नियमांना अधीन राहून हे सर्व कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरी केली गेली.
"राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन व अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने जयसिंगपूरात छ.संभाजीनगरमध्ये छ.संभाजी राजांची जयंती शंभूराजांच्या प्रतिमेला हार घालून व अभिवादन करून साध्या पद्धतीने साजरी केली गेली.
शंभूराजांच्या जयंती प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विनायक गायकवाड हे आपल्या मनोगतात म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे यांना सहा भाषा अवगत होत्या. बालपणापासूनच धाडसी व शूर असल्यामुळे त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत धडाकेबाज मोहीम यशस्वीपणे राबविल्या होत्या. ते सातत्याने रयतेचा विचार करून महिलांना व गरिबांना सन्मानाची वागणूक ते देत असत. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने व स्वकर्तृत्वावर कमी काळात त्यांनी केलेलं कार्य वाखाणण्याजोगे होते. आजही त्यांचा जीवनपट हा आपणा सर्वास प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतो.
उपस्थित मान्यवरांनी संभाजीराजांना आदरांजली वाहून अभिवादन केले. याप्रसंगी पांडू आवळे,राहिल मणेर,अभिजित पलसे, छोटू भंडारे, अभी भंडारे, पवन भंडारे, सागर खांडेकर, जॉकी वारे, विशाल वारे, आकाश धनवडे, गोटू भंडारे,विपुल पुजारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित लहान मुलांना बिस्कीट पुडे देऊन सामाजिक कार्यकर्ते युवराज उरुणकर यांनी उपस्थित मान्यवरांना कोरोना महामारीच्या संदर्भात प्रबोधन केले व शासन नियम पाळण्यास सांगितले तसेच आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
छानच सर
उत्तर द्याहटवाVery nice news sir
हटवा