Breaking

शुक्रवार, २१ मे, २०२१

'तोक्ते' चक्रीवादळानंतर आता 'यास' चक्रीवादळाची ची धडक, 27 मेपर्यंत पूर्व किनारी धडकणार. या राज्यांना बसणार फटका.

 




Cyclone Yaas : बंगालच्या पूर्व-मध्य उपसागरात 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने येत्या 26-27 मे रोजी 'यास'  (Yaas) नावाचे चक्रीवादळ पूर्व किनारी धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने बुधवारी दिली आहे.


नवी दिल्ली : भारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर तोक्ते चक्रीवादळाने धुमाकुळ घातल्यानंतर आता पूर्वेच्या किनारपट्टीवर आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व-मध्य उपसागरात 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने येत्या 26-27 मे रोजी 'यास' (Yaas) नावाचे चक्रीवादळ पूर्व किनारी धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने बुधवारी दिली आहे. हे चक्रीवादळ 72 तासांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


हवामान विभागाने सांगितलं की, यास हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकणार आहे आणि 26 मे पर्यंत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयामध्ये 25 मे पासून हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. 22 मे रोजी पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने या चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. त्याचवेळी अंदमान सागरात 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहू शकते. ते बंगालच्या खाडीपर्यंत येईपर्यंत 70 किमीची वेग पकडू शकते.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा