Breaking

रविवार, २३ मे, २०२१

सावधान! सॅनिटायझर मुलांच्या या अवयवासाठी आहे धोकादायक.




     कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्यांप्रमानेच लहान मुलांना सुद्धा या लाटेमध्ये अधिक धोका निर्माण झाला आहे. म्हणून आता लहान मुलांनी सतत मास्क वापरणे आणि हँड सॅनिटायझर वापरणे गेल्या वेळेपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहे.

परंतु काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या एका अभ्यासात्मक निरीक्षणात असे दिसून आले आहे की लहान मुलांसाठी हँड सॅनिटायझरचा वापर धोकादायक ठरू शकतो. व त्यांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

जानेवारी 2021 मध्ये JAMA Ophthalmology मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधना नुसार अल्‍कोहल-बेस्‍ड हँड सॅनिटायझरचा जास्त वापर केल्याने लहान मुलांमध्ये डोळ्यांशी निगडीत समस्या आणि विकार वाढू शकतात.

याशिवाय फ्रेंच पॉइजन कंट्रोल सेंटरचा हा दावा आहे की 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हानिकारक केमिकल मुळे डोळ्यांना होणारा धोका मागच्या वर्षीपेक्षा सात पट वाढला आहे.

लहान मुलांसाठी सॅनिटायझर चा वापर कसा करावा?

  •  जर तुमचे मुल लहान असेल तर त्याच्या हातात हँड सॅनिटायझर तुम्हीच द्या आणि तुमच्या समोरच ते वापरायला सांगा.
  • सार्वजनिक भागात ऑटोमेटिक हँड सॅनिटायझर मशीन असतात, त्याचा वापर देखील मुलांना तुमच्या समोरच करायला लावा.
  • शक्य असल्यास हँड सॅनिटायझरच्या जागी हँड वॉश करावेत.
  • जर तुमच्या मुलाचे डोळे पहिल्यापासून कमजोर असतील तर त्याला चष्मा घाला. यामुळे डोळ्यांपर्यंत केमिकल पोहोचणार नाहीत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा