रोहित जाधव / शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सतत सर्वत्र मानवतेचे दर्शन घडत असताना शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे ग्रामपंचायतीने ही कर्तव्य तत्परता दाखवली आहे.
शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंगणिक वाढ होत असून गावातील अनेक कुटुंबातील लोक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत.यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब रुग्णांच्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण होत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून कोंडिग्रे ग्रामपंचायतीने अशा गरजू लोकांना व आशा वर्कस यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
गावातील अनेक कुटुंबातील लोकांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे हे लोक भयभीत झाले आहेत. मुळात या लोकांच्या अर्थ चक्राची घडी लॉक डॉऊनमुळे विस्कळीत झाली असून त्यात असंख्य कुटुंब हे गरीब व मोलमजुरी करून खाणारे. अशा लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रश्नांकडे कोंडिग्रे ग्रामपंचायतीने मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे व विशेष लक्ष घालून गावातील सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबांना एक मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे १८ किट ग्रामपंचायतीतर्फे गावातील या संबंधित कुटुंबीयांच्या सदस्यांना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गावातील सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा सेविका यांनाही या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी गावचे मा.सरपंच बाळासाहेब हांडे व कोरोना दक्षता समितीच्या वतीने गावातील सर्व नागरिकांना सतत मास्कचा वापर करा,मास्क शिवाय घराबाहेर पडू नका.हात साबणाने स्वच्छ धुवा,सॅनेटायझरचा वापर करा. ताप.सर्दी.खोकला.घसा दुखणे. धाप लागणे .खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्यास जवळच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन तपासणी करून घ्या असा प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला. जीवनावश्यक वस्तू वाटण्यासाठी गावातील संजय घोडावत टेक्स्टाईल,सुलतानपुरी प्रायव्हेट लिमिटेड,चार भुजा औद्योगिक वसाहत,एस.आर. सी. सिमेंट काँक्रीट,सिद्धिविनायक कॉटन मिल, हॉटेल जननी,गुरुदत्त शुगर टाकळी यांच्याकडून १०० किलो साखर याचबरोबर शरद सहकारी साखर कारखाना नरंदे यांच्याकडून १०० किलो साखर तसेच दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ यांच्याकडून ५० किलो साखर व इतर जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. सदरच्या आयोजनामध्ये कोंडिग्रे ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य लाभले.सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन कोंडिग्रे गावचे सरपंच बाळासाहेब हांडे, उपसरपंच संगीता काडगे, ग्रामसेवक विजयसिंह रजपूत,पोलीस पाटील डॉ.सतीश कांबळे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
मौजे कोंडिग्रे ग्रामपंचायतीने केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा