प्रा.अक्षय माने:
भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) च्या मते, इशारा संदेशात वादळांची त्वरित ओळख पटवून देण्यासाठी उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नावे देण्याची प्रथा अनेक वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. कारण नावे संख्यांपेक्षा आणि तांत्रिक बाबीपेक्षा लक्षात ठेवणे खूप सोपे असते. तसेच वादळांना नावे दिल्यामुळे माध्यमांना उष्णकटिबंधीय चक्रीवादळांवर अहवाल देणे सुलभ होते, नावावरून वादळाची तीव्रता किंवा धोका किती आहे सांगता येते आणि त्यानुसार पूर्व तयारी करता येते.
उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची नावे विशेषतः अशी निवडली जातात जी त्या त्या प्रदेशातील लोकांना परिचित आहेत.
💡चक्रीवादळाची नावे कोणती संस्था ठरवते?
कोणत्याही समुद्राच्या खोऱ्यात उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या नावांची यादी निश्चित करण्यासाठी एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेनुसार त्या बेसिनसाठी (basin) जबाबदार 'उष्णकटिबंधीय चक्रीवादळ प्रादेशिक संस्था' त्याच्या वार्षिक / द्विवार्षिक बैठकीत ही नावे निश्चित करतात.
💡पुढील पाच क्षेत्रीय उष्णकटिबंधीय चक्रीवादळे संस्था आहेत.
1. ESCAP/WMO Typhoon Committee
2. WMO/ESCAP Panel on Tropical Cyclones
3. RA I Tropical Cyclone Committee
4. RA IV Hurricane Committee
5. RA V Tropical Cyclone Committee
याव्यतिरिक्त, आर.एस.एम.सी (Regional Specialized Meteorological Centres) त्यांच्या संबंधित प्रदेशांवरील माहिती, सल्ला, इशारा, देखरेख आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या भविष्यवाणीसाठी जबाबदार असते. ते चक्रीवादळला नावे देण्यासही जबाबदार असतात. सर्वसाधारणपणे, विषुववृत्तीय चक्रीवादळांना प्रांतीय पातळीवरील नियमांनुसार नावे दिली जातात.
उदाहणार्थ नॅशनल चक्रीवादळ समिती (नॅशनल Hurricane Committee) अटलांटिक महासागरातील वादळांसाठी चक्रीवादळाच्या नावांची पूर्व-नियुक्त यादी निश्चित करते.
वेगवेगळ्या महासागर खोऱ्यातील (basin) उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या नावांचा तपशील जागतिक हवामान संस्था (डब्ल्यूएमओ). https://public.wmo.int/en/our-mandate/focus-areas/natural-hazards-and-disaster-risk-reduction/tropical-cyclones/Naming वेबसाइटवर पाहता येईल.
💡 भारत व भारतीय महाद्विप भागात होणारी चक्रीवादळे व त्यांच्या नावांची प्रक्रिया कशी असते?
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राला लागून असलेल्या डब्ल्यूएमओ / ईएससीएपी (WMO/ESCAP) पॅनेल प्रदेशातील देशांकरिता हवामानातील बदल आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळ सल्ला देण्याची जबाबदारी नवी दिल्लीतील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचे प्रादेशिक विशेष हवामानशास्त्र केंद्र (आरएसएमसी-The Regional Specialized Meteorological Centre ) वर सोपविण्यात आली आहे. या भागातील चक्रीवादळांना नावे देण्याची जबाबदारी सुध्दा याच संस्थेकडे आहे.
सप्टेंबर, 2018 मध्ये ओमानच्या मस्कट येथे आयोजित डब्ल्यूएमओ / ईएससीएपी पीटीसी 45 व्या सत्रादरम्यान, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब या पाच नव्या देशांना मेंबर म्हणून समावेश करण्यात आले आहे. आणि पूर्वीपासून असलेल्या 8 देशांसोबत (भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड) आता भारतीय उखंडातील तयार होणाऱ्या उष्णकटिबंधीय वादळांना नावे देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या प्रत्येक मेंबर देशाकडून प्रत्येकी 13 अशी एकूण 169 नावे वादळांना देण्यासाठी ठरवण्यात आली आहेत.
2020 मध्ये आलेल्या चक्रीवादळला निसर्ग हे नाव बांगलादेश ने दिले होते, त्यानंतर येणाऱ्या चक्रीवादळला नाव देण्याचा नंबर म्यानमार या देशाचा होता ज्याने तौकते(Tauktae) असे नाव सुचवले होते.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) 28 एप्रिल २०२० रोजी बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात उदयास येणाऱ्या 169 (प्रत्येकी 13 नावे WMO/ESCAP सदस्य राष्ट्रांकडून) उष्णकटिबंधीय चक्रीवादळांच्या नावांची नवीन यादी जाहीर केली आहे.
आरएसएमसी (नवी दिल्ली) प्रत्येक उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला खाली दिलेल्या नावाच्या यादीतून नाव देते जी वादळे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात तयार होतात.
जर एखादे वादळ बरेच नुकसान / विनाश करून गेले आणि बर्याच मृत्यूंना कारणीभूत ठरले असेल तर त्याचे नाव निवृत्त केले जाते आणि भविष्यात पुन्हा वापरले जात नाही.
💡भविष्यात भारतीय उपखंडात होणाऱ्या चक्रीवादळाची नावे आणि ज्या सदस्य राष्ट्रांकडून ते ठेवण्यात आले आहे त्याची यादी पुढील प्रमाणे;
1. यास(Yass) ( जस्मिन चे फुल)- ओमान,
2. गुलाब- पाकिस्तान,
3. शाहीन(अर्थ- ससाणा पक्षी) -कतार
4. जवाद(Jawad- घोडा) - सौदी अरेबिया,
5. असानी(Asani)- श्रीलंका,
6. सित्रंग(Sitrang)- थायलंड,
7. मंडौस(Mandous)- युनायटेड अरब अमिराती,
8. मोचा(Mocha)- येमेन
💡 तुम्ही सुद्धा वादळांना नावे सुचवू शकता
आयएमडीला यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सामान्य लोक देखील नावे सुचवू शकतात. खाली दिल्या प्रमाणे प्रस्तावित नावाने काही मूलभूत निकष पूर्ण केले पाहिजेत.
• नाव ठरवताना ते लहान आणि सहज समजले पाहिजे.
• नावे सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील असणे आवश्यक आहे आणि ते अनपेक्षित आणि भडकाऊ अर्थ दर्शवू नये.
💡सूचित नावे खालील पत्त्यावर पाठविली जाऊ शकतात.
हवामानशास्त्र महासंचालक,भारत हवामान विभाग,मौसम भवन, लोडी रोड,नवी दिल्ली -110003.
(लेखक भौतिकशास्त्र विभागात शिक्षक असून अवकाश विज्ञानात संशोधन करत आहेत.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा