प्रा.अक्षय माने/ प्रमुख प्रतिनिधी :
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२० हिवाळी सत्रातील विद्यापीठ स्तरावरील सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. तथापि राज्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या कारणास्तव दि. १७/५/२०२१ व दि. १८/५/२०२१ रोजी होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत.
तसेच सदर स्थगित करण्यात आलेल्या १७/५/२०२१ रोजीच्या परीक्षा शनिवार दि.२२/५/२९२१ रोजी व दि. १८/५/२०२१ रोजीच्या परीक्षा रविवार दि.२३/५/२०२१ रोजी आयोजित वेळेत होतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच सदर चे परिपत्रक सर्व संबंधितांना निर्दशनास आणून देण्याबाबत परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले आहे. अशा प्रकारची माहिती दि.१६ मे २०२१ रोजीच्या परिपत्रकाने 'परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे' संचालक श्री. गजानन पळसे यांनी दिली आहे.
![]() |
परीक्षा संचालक श्री गजानन पळसे |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा