Breaking

सोमवार, १७ मे, २०२१

कुरुंदवाड मध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून रचनात्मक काम

 



विठ्ठल गुदळे/प्रमुख प्रतिनिधी :

    कुरुंदवाड शहरात महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रमा बरोबर विविध सामाजिक कार्यक्रम हाती घेऊन जयंती साजरी करण्यात आली.

       अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंतीचे औचित्य साधून  संपूर्ण देशभरात   लिंगायत बांधवाकडून मोठ्या  आनंदाने व शांततामय पद्धतीने जयंतीपर कार्यक्रम साजरे केले जात असतात.     

       शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड या ऐतिहासिक शहरात तेथील समस्त  लिंगायत बांधवांनी धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध रचनात्मक कामानी जयंती साजरी केली. सुरुवातीस महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बसवेश्वर चौकात त्यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर समस्त बांधवांनी कोरोना महामारीच्या काळात अहोरात्रपणे सेवा बजाविणाऱ्या कुरूंदवाड शहरातील सफाई कामगार , पोलीस , वैद्यकीय सेवेतील कर्मचारी व पत्रकारबंधूं या कोरोना योद्ध्यांना  व भाजीमंडई येथील गरीब व गरजू घटकांना सैनीटायझर व मास्कचे वाटप करून महात्मा बसवेश्वरांना अपेक्षित असणारा मानवतावादी काम त्यांनी केले आहे. 



  त्यानंतर या कार्यक्रमात बसवेश्वर महाराज यांच्याविषयी भाष्य करताना प्रा.मनोहर कोरे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर यांनी जातीअंताची लढाई त्या काळातील प्रस्थापितांविरुद्ध करून समाजातील विविध जातींना एका उदात्त विचारानी व तत्त्वांनी बांधून 

वीरशैव लिंगायत धर्माची स्थापना केली. त्यांनी विविध जातीना एकत्रित करून रोटी-बेटी व्यवहार घडवून आणलेला होता. आज भारतीय संविधानाला अपेक्षि त वाटचाल करावयाची असेल तर महात्मा बसवण्णा यांचाच विचार पुढे न्यावा लागेलत्. त्याकाळात असंख्य विविध जातीचे लोक या धर्माशी जोडले गेले.  सर्व धर्माचा मुख्य सार एकत्रितरीत्या बसवन्ना नि स्थापन केलेल्या  धर्मामध्ये दिसून येतो. माणसाला माणूसपण देणारा, मानवता, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारा व व्यवहारवादी विचाराबरोबर नैतिकतेचे अधिष्ठान व तत्वांना एकसंघ करून सर्व मानवांना एकत्रित करणारा धर्म बसवेश्वर यांनी स्थापन केला. हा धर्म आजच्या घडीला प्रत्यक्षात आदर्शवादापेक्षा, व्यवहार व सत्याला न्याय देणारा आहे. जो धर्म एकेश्वरवाद मानून  अंधश्रद्धेला व कर्मकांडाला कधीही थारा देणार नाही  अशा प्रकारचे उत्तम विचार व्यक्त केले.



    या कार्यक्रमात महात्मा बसवन्ना सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिदानंद आवटी,उद्योजक सुरेश माळी,उद्योजक सुनील गुरव, रघुनाथ माळी,सचिन तोडकर,दिपक परीट,अनिल माळी, काडगोंडा पाटील आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

     महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने केलेल्या रचनात्मक कार्याचा सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा