Breaking

शनिवार, १ मे, २०२१

"शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीत; विद्यार्थ्यांचा ९९% प्रतिसाद : परीक्षा नियंत्रक श्री.गजानन पळसे"


             राज्यात कोरोना महामारीची वाढती परिस्थिती पाहून राज्य सरकारने  लॉकडाऊन जाहीर केला.या कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक अटी व  निर्बंध घालून त्याची कडक व अत्यंत दक्षपणे अंमलबजावणी सुरु आहे.

     शासनाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील ऑक्टो/ नोव्हें २०२० हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्थगित करण्यात आलेल्या परीक्षेबाबत शासनाने जारी केलेल्या नवीन निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठाने B.Sc.Bio-Tech.,B.Sc.IT,B.Sc.

Sugar Tech.,B.Sc.-Food Processing & Pack.,B.Sc.Computer Science,BCS,B.B.A., B.C.A., B.S.W.,B.I.D., B.D.F.C.,B.F.T.M.,B.Voc.,M.A.,BDS,B.Sc.Comp.Sc.,M.Lib.,MSW,M.Com.,Master of Valuation,MCA,M.Sc.(Nano Sc. & Tech.),MA/M.Sc.(Geography),M.Sc.,B.Sc.,B.A.या अभ्यासक्रमाच्या परीक्षा  ऑनलाईन प्रणाली द्वारे आज दि. २६ एप्रिल २०२१ रोजी पार पडल्या. 

           तसेच सदर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी २८३९५ परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी २८०३३ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा दिली. यासाठी ९८.७२% विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणीचे योग्य निराकरण विविध माध्यमातून करण्यासाठी विद्यापीठ परीक्षा विभाग तसेच सॉफ्टवेअर पुरवठादार कंपनीची यंत्रणा सक्षम व कार्यरत होती. त्यामुळे आजची परीक्षा ही अत्यंत उत्तम व यशस्वीपणे पार पडली आहे.अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून प्राप्त झाली आहे.

        उर्वरित सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा अशाच पद्धतीने होतील याकामी विद्यापीठ परीक्षा विभाग व संबंधित घटक कार्यक्षम व दक्ष आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा