Breaking

रविवार, १६ मे, २०२१

धक्कादायक : वीज पडल्याने एकाच वेळी १८ हत्तींचा मृत्यु;



    आसाम :आसामच्या नागाव जिल्ह्यातील प्रस्तावित खंडली रिझर्व फॉरेस्ट व खातियाटोली फॉरेस्ट रेंज मध्ये बरहंपुर या ठिकाणी वीज पडून एकाच वेळी १८ हत्ती मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना १४ मे २०२१ रोजी घडली.     



            आसामचा हा परिसर निसर्गरम्य व जंगलमय असून या ठिकाणी हत्तीसाठी फॉरेस्ट म्हणून हा भाग प्रस्तावित होता. मात्र नैसर्गिक वीज पडून या एकूण १८ हत्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत आसामचे वनमंत्री परिमल शुकलबैद्य यांनी या प्रकारची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. शुकलबैद्य म्हणाले की, अशी घटना आसाम मध्ये यापूर्वी कधीही घडली नाही. वीज पडल्याच्या कारणाशिवाय अजून दुसरे कोणते कारण असू शकते का याचीही गंभीरपणे चौकशी केली जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

         या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे वन्यप्रेमी प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा