Breaking

गुरुवार, २० मे, २०२१

"सांगली शहरात टाळेबंदीमुळे निरव शांतता"



 


प्रविणकुमार माने/ उपसंपादक :

     सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली पोलीस यंत्रणा व सांगली महानगरपालिका यांच्या संयुक्तपणे कोरोना महामारी साथीला अटकाव करण्यासाठी टाळेबंदीचे काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असून यामुळे सांगली शहरात निरव शांतता पसरली आहे.

       सांगली शहर व परिसरात सांगलीकरांनी बेजबाबदारपणे कोरोना संक्रमण वाढवीत आहेत हे प्रशासनाच्या लक्षात येताच वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली महानगरपालिका व सांगली पोलीस ठाणेच्या माध्यमातून नागरिक अनावश्यकरित्या, बेजबाबदारपणे  बाहेर पडू नयेत व प्रादुर्भाव रोखावा यासाठी अत्यंत दक्षपणे कार्यरत  आहेत.

       सांगली शहरातील विविध चौकात व गर्दीच्या महत्त्वाच्या ठिकाणी अत्यंत नीरव शांतता पसरली होती. यामध्ये सांगली पोलीस व सांगली महानगरपालिका यशस्वी झाली आहे असं दिसून येतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा