Breaking

गुरुवार, २० मे, २०२१

*चला थोडं सामाजिक भान जपूया......या शीर्षकाखाली 'आम्ही जांभळीकर' ग्रुपच्या वतीने कालवश 'संदीप यादव' यांच्या कुटुंबियांना ६३ हजार रुपयांची केली आर्थिक मदत"*

 





संदिप यादव, जांभळी 

🌳 *आम्ही जांभळीकर*

मित्रहो जांभळी ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथील आम्ही जांभळीकर ग्रुप वृक्षारोपणाचे कार्यासाठी प्रसिद्ध आहे. जांभळी च्या माळरानावर दहा एकर जागेत ऑक्सीजन पार्क उभारण्याचा संकल्प या ग्रुपच्या वतीने केला असून गेले वर्षभर सातत्याने ग्रुप त्यासाठी मेहनत घेतो आहे.


कोरोना संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत समाजाप्रती आपण काही तरी देण लागतो या भावनेतून कर्ता पुरुष गमावलेल्या यादव कुटुंबीयांसाठी  मदत गोळा करून ग्रुपने आपली सामाजिक बांधिलकी जपली.


   मित्रहो कोरोनाने अनेकांचे संसार उध्वस्त केले आहेत. जिवाभावाची माणसं या कोरोनाने आपल्यापासून हिरावून घेतली आहेत. आणि त्यातल्या त्यात जर घरातील कर्ता पुरुष जर कुटुंबाने गमाविला तर त्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवत असेल याचा विचारच न केलेला बरा..... त्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल?   

 

       काही दिवसांपूर्वी जांभळी मध्ये माळभागावरील एका कुटुंबावर कोरोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. अत्यंत गरिबीची परिस्थिती असताना काबाडकष्ट करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या अवघ्या *३४ वर्षे वयाच्या संदीप यादव* या युवकाचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला.


     हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना या टाळेबंदीच्या काळात घर चालविणे सुद्धा तारेवरची कसरत झाली आहे. अशातच जर कोरोनाने गाठले तर औषधोपचारांचा खर्च करायचा कुठून? खरंच परिस्थिती अतिशय गंभीर आहे.


     संदीप यादव यांच्या पश्चात दोन छोटी मुले आणि पत्नी असा परिवार आहे. मुलगी चार वर्षांची असून मुलगा दोन वर्षांचा आहे. सध्या हे कुटुंब भाड्याच्या घरात राहते. स्वतःचं घर किंवा शेती अशी कोणतीही स्थावर मालमत्ता नसून परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. अशाही परिस्थितीत जमेल तेवढा पैसा गोळा करून त्यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये यश आले नाही. आज सद्यस्थितीला दवाखान्याचे ७० हजार रुपये बिल देणे बाकी आहे.

 

          जांभळीतील माळ भागावरील अनेक लोक स्वयंस्फूर्तीने संदीपच्या कुटुंबीयांसाठी मदत जमा करत आहेत.ग्रुपमधील सदस्यांना कळकळीची विनंती आहे की, ज्यांना मदत करणे शक्य असेल त्यांनी या संकटाच्या काळात मदत करण्यासाठी पुढे यावे. किमान शंभर रुपयांपासून पुढे आपल्याला जमेल तेवढी मदत आपण करू शकता अशावेळी या कुटुंबाला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे अशा प्रकारचा आवाहन 'आम्ही जांभळीकर' या ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते.


  सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही जांभळीकर या ग्रुपमधील सदस्यानी यथाशक्य त्या पद्धतीने रक्कम देऊ केली. *त्यामुळे केवळदोन दिवसात ६३ हजार रुपयाची मोठी रक्कम जमा झाली. याशिवाय एका महिन्याचे राशन ही ग्रुपच्या वतीने देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर त्या कुटुंबाला दुःखातून सावरून त्यांची आर्थिक घडी व्यवस्थित होईपर्यंत दरमहा एक हजार रुपये मदत करण्यात येणार आहे*


सामाजिक भान जपत *आता नावासाठी नाही ,फक्त गावासाठी*' हे ब्रीदवाक्य ग्रुपच्या सदस्यांनी खरे करून दाखविले.


 त्यामुळे *आम्ही जांभळीकर* या ग्रुपमधील सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

1 टिप्पणी: