गीता माने : सहसंपादक
मुळात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जनता भयभीत झाली आहे. अशावेळी निसर्गाने ही रौद्ररूप धारण केल्यामुळे समुद्रात अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळात रूपांतर होऊन सातत्याने अवेळी खंडितपणे पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम म्हणून वातावरणात अचानक बदल झाल्याने सर्दी, ताप व थंडीचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कदाचित लोकांचे आरोग्य बिघडू शकते. अशावेळी जयसिंगपूर शहर व परिसरातील नागरिक अस्वस्थ होऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ.पांडुरंग खटावकर यांनी जनतेस न घाबरण्याचं आवाहन केले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती उपचार व खबरदारी घेतल्यास या आजारातून मुक्तता मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना आणि सध्याचे वातावरणीय बदलामुळे निर्माण होणारे आजार यांचा सहसंबंध लावून नागरिकांनी घाबरून जाऊ नये अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले आहे.
चांगला प्रयत्न.
उत्तर द्याहटवाअतिशय नेमकी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे
उत्तर द्याहटवा