Breaking

सोमवार, २४ मे, २०२१

महत्त्वाचं! 31 मे पूर्वी तुमच्या बँक खात्यातून कापले जाणार 12 रुपये, बदल्यात मिळणार 2 लाखांची सुविधा

 

जाणून घ्या खात्यातून पैसे नेमके कसे आणि कोणत्या कारणासाठी कापले जाणार ?

 



नवी दिल्ली : सध्याच्या घडीला बँकांकडून पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना (PMSBY) साठीच्या प्रिमीयमसंदर्भातील एक मेसेज सर्वांनाच पाठवत आहे. याशिवाय इतर माध्यमांतूनही संपर्क साधत बचत खातेधारकांनाही यासंदर्भातील माहिती देण्यात येत आहे. Pradhan Mantri Suraksha Bima Yojana ही एक अशी योजना आहे जिथं अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्वं ओढावल्यास इंश्युरन्स प्रदान करण्यात येतो.


     एका वर्षाचं कवर असणाऱ्या या योजनेला दर वर्षी रिन्यू करावं लागतं. ज्यांनी यापूर्वीच या योजनेमध्ये नाव नोंदवलं आहे, अशा खातेधारकांच्या खात्यातून डेबिट सुविधेच्या माध्यमातून 12 रुपये (जीएसटीसहित) प्रिमियम आकारलं जातं. प्रती वर्षी तुमचं खातं या योजनेसाठी 25 ते 31 मे या काळात डेबिट होईल.


PMSBY योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो


ज्या व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज करत त्याअंतर्गत नोंदणी केली आहे, अशाच व्यक्तींच्या खात्यातून ही रक्कम कापली जाणार आहे. यासाठी कोणत्याही बँकेत जा तुम्हाला अर्ज भरता येणार आहे, अथवा बँकेच्या नेट बँकिंग सुविधेच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करु शकता.


       PMSBY या योजनेला लाभ अमुक एका व्यक्तीला 18-70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना घेता येतो. ही योजना घेतेवेळीत PMSBY शी बँक खातं लिंक करण्यात येतं. हा विमा घेणाऱ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा त्याला अपंगत्त्वं आल्यास त्या व्यक्तीला किंवा त्यांच्या वारसाला (नोंद करण्यात आलेल्या) 2 लाख रुपयांची रक्कम मिळते.


      ही रक्कम मिळवण्यासाठी नॉमिनी किंवा सजर व्यक्तीनं बँक किंवा इंश्युरन्स कंपनीकडे जाणं गरजेचं असतं, जिथून पॉलिसी खरेदी केली होती. इथं त्यांना एक फॉर्म देण्यात येईल त्यावर तुमची महत्त्वाची माहिती भरुन मग पुढील प्रक्रिया करण्यात येईल.



1 टिप्पणी: