Breaking

शुक्रवार, २१ मे, २०२१

"परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना मिळणार पंधराशे रुपये अनुदान* : *सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर"

 


प्रा.अक्षय माने / प्रमुख प्रतिनिधी

        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले होते. परंतु आजतागायत या अनुदानाविषयी कोणतीही माहिती प्राप्त झाला नसल्यामुळे ऑटोरिक्षा चालक वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विषयी उलटसुलट चर्चा सुरू होती.परंतु आज सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑटो रिक्षा चालकांना दिलासा मिळणार आहे. 

        लाॅकडाऊनच्या काळात अनेक घटकांना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, याचाच भाग म्हणून ऑटोरिक्षा परवानाधारकांना 1500 रू. अनुदान देण्यात येणार आहे.  

        यासाठी परिवहन विभागातर्फे संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली असून परिवहन विभागाच्या  transport.maharashtra.gov.in या साईटवर सदर लिंक उजव्या वरच्या कोपऱ्यात शनिवार दि. 22 मे रोजी रात्रीपासून उपलब्ध होत आहे. संबंधितांनी  त्या ठिकाणी अर्ज करावयाचा आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.

       सदर लिंक ओपन करून अर्ज करण्यापूर्वी ऑटोरिक्षा क्रमांक, लायसन्स, आधारकार्ड आदींचा वापर करावा. फक्त वारसाच्या प्रकरणांमध्ये परवान्याच्या मूळ प्रतीची आवश्यकता आहे.

  सर्व प्रक्रिया फक्त ऑनलाईनच करण्याची आहे. त्यानुसार 21 मे 2021 रोजी सर्व ऑटोरिक्षा संघटना, ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशन्स, विमा प्रतिनिधी, वाहन व अनुज्ञाप्ती कार्यकर्ते यांच्यासाठी अर्ज कसा भरावा याचे ऑनलाईन प्रशिक्षण सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे (मो.क्र. 9405874762) यांनी दिले. अर्ज करताना काही अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज करण्यासाठीचा फ्लोचार्ट सर्वांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.  जिल्ह्यातील सर्व संघटना, स्कुल्स, विमा प्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्यासह मोबाईल साक्षर शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीं यासाठीही ऑटोरिक्षा परवानाधारकांना मदत करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा