Breaking

रविवार, ३० मे, २०२१

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधील मुस्लिमेतर निर्वासितांना मिळणार भारतीय नागरिकत्व


    दिल्ली : केंद्र सरकारनं पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या मुस्लिमेतर नागरिकांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. या देशातून आलेल्या मुस्लिमेतर निर्वासितांकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. २८ मे रोजी केंद्रानं यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. या देशांमधून आलेल्या हिदू, जैन, शीख, पारशी आणि बौद्ध धर्मीय नागरिक जे गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ, हरियाणा आणि पंजाबच्या १३ जिल्ह्यांमध्ये राहत आहेत, त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.केंद्रीय गृहमंत्रालयाचनं नागरिकत्व कायदा १०५५ आणि अंतर्गत वर्ष २००९ मध्ये मागवण्यात आलेल्या कायद्यांतर्गत हा निर्णय घेतला आहे. तसंच हे त्वरित लागू करण्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. दरम्यान, याचा सीएए (CAA) या कायद्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. सीएएशी निगडीत नियम अद्याप तयार करण्यात आलेले नाहीत.नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम १६ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारनं ही अधिसूचना जारी केली आहे. या कायद्याच्या कलम ५ अंतर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिक म्हणून नोंदणी करता येईल किंवा कलम ६ अंतर्गत भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिलं जाऊ शकते.








      


       हे अर्ज ऑनलाइन पद्धतीनं स्वीकारले जातील.या अर्जांची पडताळणी राज्यस्तरीय व जिल्हा पातळीवर करण्यात येईल. राज्याचे गृहसचिव किंवा जिल्हाधिकारी यांना यानंतर हे अर्ज आणि अहवाल केंद्र सरकारला त्वरित ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करुन द्यावे लागतील. ऑनलाइन व्यतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा सचिव एक ऑफलाइन म्हणजेच एक रजिस्टरही तयार करतील. यामध्ये भारतीय नागरिकांच्या रूपात त्यांच्याकडे अर्ज करणाऱ्या निर्वासितांची माहितीही असेल. याची एक प्रत त्यांना सात दिवसांच्या आत केंद्र सरकारला पाठवावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा