Breaking

सोमवार, ३१ मे, २०२१

"शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आयोजित 'माझे गाव कोरोनामुक्त गाव मोहिमेचे' प्रचंड सकारात्मक स्फूर्तीने ऑनलाइन उद्घाटन संपन्न"

 



प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


    कोरोना महामारीची पार्श्वभूमी पाहता शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सातत्याने विविध पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबवून समाजाची सेवा केली जात असते. या अगोदर कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयातील NSS कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली NSS च्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम केलं होतं त्याचबरोबर मास्क व सॅनिटायझर  वाटप करून समाजात आपली सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवलं होतं.

      त्यानंतर शासनाचे हात बळकट करण्यासाठी शासनप्रणित 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' या अभियानांतर्गत  संबंधित सर्व घटकांचे स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी शरीराचे तापमान व ऑक्सिजन पातळी मोजणे अशा प्रकारच्या कामाच्या माध्यमातून काळजीपोटी समाजाशी एक कौटुंबिक नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता.

  


        ही सर्व सेवाभावी व सकारात्मक पार्श्वभूमी असताना शिवाजी विद्यापीठाचे  राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.अभय जायभाये यांच्या समाजाप्रति असलेल्या संवेदनशील भावनेतून 'माझे गाव कोरोनामुक्त गाव' ही कल्पना सुचली आणि ही कल्पना प्रत्यक्षात सत्यात उतरविण्याचे काम शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.डॉ.डी.टी.शिर्के यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनामुळे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुरू झाली. 

        कुलगुरू प्रो.डॉ.डी.टी.शिर्के यांच्या मार्गदर्शनानुसार 'माझं गाव कोरोनामुक्त गाव' या मोहिमेला शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या महाविद्यालयांनी गावे दत्तक घेऊन प्रचंड स्फूर्तीने या मोहिमेचा प्रारंभ केला आहे.

      मात्र आज औपचारिकपणे शिवाजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. राज्यसंपर्क अधिकारी महाराष्ट्र शासन डॉ. प्रभाकर देसाई, मा. युवा अधिकारी महाराष्ट्र आणि गोवा राज्य, डॉ.अजय शिंदे यांनी या  मोहिमेचा प्रचंड कौतुक करून राज्य शासनाने ही या योजना काही पातळीवर स्वीकारलेली असून यामुळे  शिवाजी विद्यापीठाच्या या मोहिमेचे ठळक महत्त्व लक्षात येते.      

   त्याचबरोबर माजी राज्यसंपर्क अधिकारी प्राचार्य डॉ.अतुल साळुंखे यांनी चौफेर मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाने आजतागायत सुरू केलेले प्रत्येक  मोहीम व अभियान समाजोपयोगी असून मानवी संवेदनशीलता दर्शविणारी आहे. त्यामुळे प्रा. जायभाये यांची ही कल्पना अप्रतिम असून त्यामुळे सामाजिक संवेदनशीलता व जागृती निर्माण करण्याचा यथोचित प्रयत्न आहे. त्यानंतर त्यांनी कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले.

      मा. राष्ट्रीय सेवा योजना संचालक तथा अभियानाचे संकल्पक प्रा. अभय जायभाये यांनी प्रास्ताविक करताना ते म्हणाले की, 'माझे गाव कोरोनामुक्त गाव' ही मोहीम जनतेची काळजी घेणारी व प्रबोधन करणारी असली पाहिजे यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंप्रेरित व स्वयंशिस्त असणारे सर्व कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक  विद्यार्थी निश्‍चितपणे दत्तक घेतलेली गावे कोरोनामुक्त करतील अशी अपेक्षा आहे.

      किसनवीर महाविद्यालय  वाई येथील स्वयंसेवक विद्यार्थीनी कु. दिव्या मतकर, सावर्डे ता. तासगाव येथील सरपंच मा.प्रदीप माने-पाटील यांनी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कौतुक करीत आपले  मनोगत व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याशिवाय कोणत्याही कार्याला यश मिळत नाही अशा प्रकारचं कौतुकास्पद मत याप्रसंगी व्यक्त केले.

   या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाष्य करताना कुलगुरू प्रो.डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले की, माझे गाव कोरोनामुक्त गाव ही मोहीम म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे डायरेक्टर, सर्व  कार्यक्रम अधिकारी,राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी यांची मोठी जबाबदारी असून जोपर्यंत दत्तक गावे पूर्ण कोरोनामुक्त होणार नाही तोपर्यंत ही मोहीम अशीच चालू राहणार आहे त्याचबरोबर ही मोहीम शत प्रतिशत यशस्वीपणे फत्ते करणार अशा प्रकारचा आशावाद त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला. तसेच विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचं मनस्वी कौतुक करून प्रचंड सकारात्मक स्फूर्ती दिली.

       


    या रचनात्मक व मानवतावादी मोहिमेचे पहिले पुष्प सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक व अर्थतज्ज्ञ मा.प्रा.डॉ.संजय ठिगळे यांनी वास्तववादी,व्यवहारवादी व कृतिशील विचाराने पहिल्या पुष्पाची गुंफून केली. त्याचबरोबर 'एकच टास्क वापरा मास्क' हे वैयक्तिक अभियान सर्वांनी सुरू करण्याबाबत त्यांनी आव्हान केले.पहिल्या पुष्पाचे अध्यक्षस्थानी मा. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर हे होते. त्याने हे सखोल व मौलिक मार्गदर्शन केले .पहिल्या पुष्पाचे आभार प्रदर्शन प्रा. आनंद घोरपडे यांनी उत्तम पद्धतीने मानले.

      या संपूर्ण उद्घाटन समारंभाचे प्रेरणादायी आभार प्रदर्शन सांगली जिल्हा समन्वयक प्रा. सदाशिव मोरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे उत्तम अहवाल वाचन व दोन्ही सत्राचे प्रचंड ऊर्जा निर्माण करणारे सूत्रसंचालन कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. डी. जी. चिघळीकर यांनी केले.

     शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कक्षाकडून सुरू असलेल्या मोहिमेस ४०० पेक्षा जास्त गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध महाविद्यालयांतील प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी हे या ऑनलाइन उद्घाटन समारंभात उपस्थित होते.

           सदर ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम व मोहिमेचे सर्व पातळीवर कौतुक होत असून दत्तक गावातील लोकांना शिवाजी विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व घटकांविषयी मनोभावे ऋण व्यक्त केले आहे.

३ टिप्पण्या: