जागतिक आरोग्य संघटना व आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांच्या संयुक्तपणे २०२० पासून लॉकडाउन काळात अधिक तास काम केल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याचा संशोधनात्मक अभ्यास करण्यात आला.धक्कादायक म्हणजे ५५ तासापेक्षा अधिक तास सातत्याने काम करणाऱ्या लोकांना हृदयरोग व मेंदू आघातामुळे मृत्यु संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या पहिला व दुसरा लाटेत कोरोना साथीला थांबविण्यासाठी शासनाने सातत्याने जारी केलेल्या नियमानुसार लॉकडाऊन वेळोवेळी जाहीर केलं होतं. त्यामुळे covid-19 च्या काळात 'वर्क फ्रॉम होम'या नवीन संकल्पना अस्तित्वात येऊन त्याची सवय आता लोकांच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळे लोकांची जीवनशैली २०२० नंतर पूर्णतः बदललेली असून त्यामुळे आठवड्यातून ५५ तासांपेक्षा अधिक काळ घरी राहून सातत्याने काम करीत आहेत. तसेच व्यायामाच्या अभावामुळे शरीराची स्थूलता वाढली असून नकारात्मक मानसिकतेने घर केलेले आहे. त्यामुळे नैराश्यपूर्ण मानसिकतामुळे शरीरावर व मनावर ताण पडत असून त्यामुळे हृदय रोग व आघात यासारख्या व्याधी जडून मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे लोकांनी योग्य ती काळजी घेऊन आपलं आरोग्य संतुलित ठेवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा