गणेश कुरले : धरणगुत्ती प्रमुख प्रतिनिधी
धरणगुत्ती गावामध्ये दरवर्षी प्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गणेशोत्सव तरुण मंडळ व धरणगुत्ती ग्रामपंचायतीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केली जात असते. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण करून मनोभावे साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
२७० वर्षापूर्वी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी एक स्त्री म्हणून उत्कृष्ट प्रशासन ,आदर्श राज्यकारभार ,जनहितासाठी कठोर निर्णय आणि त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करून एक सुशासन प्रस्थापित केले होते. कोल्हापूर जिल्ह्यात केलेलं धार्मिक कार्य, बांधलेल्या धर्मशाळा, वृक्षारोपण व पिण्यासाठी विहिरींची व्यवस्था करून त्यांचे कार्य आज ही समाजोपयोगी व कौतुकास्पद आहे.
समाज हिताचे व लोकोपयोगी कामे करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला गणेशोत्सव तरुण मंडळाचे कारभारी मा.धोंडीराम हेरवाडे तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व श्री दत्त सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळ, संचालक मा. शेखर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात ५० वृक्षांचे रोपण करून अनोख्या पद्धतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करून अभिवादन केले.
सदर गणेशोत्सव तरुण मंडळाच्या जयंती प्रसंगी आण्णापा आरगे, सुरेश आरगे ,अशोक आरगे, कल्लाप्पा हेरवाडे,काशिनाथ गावडे, महादेव आरगे, काशिनाथ आरगे हे समाज बांधव उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या जयंती प्रसंगी सुरेश आरगे, अजित कांबळे, पोलीस पाटील संभाजी भानुसे,बाबासाहेब कारंडे व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा