Breaking

मंगळवार, १८ मे, २०२१

"डी.जी. कॉलेजमध्ये 'स्टेट बँक भरती' परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग"

 


गीता माने/सहसंपादक :

        रयत शिक्षण संस्थेच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील'बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या' वतीने १० मे २०२१ पासून स्टेट बँक ऑफ इंडिया ज्युनियर असोसिएट भरती परीक्षा बाबत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आलेला आहे. एप्रिल २०२१ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मधील ज्युनियर असोसिएट पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून सदर जाहिरातीनुसार ५२३७ पदांची भरती केली जाणार आहे.

        यामध्ये विविध प्रवर्गातील पदे भरली जाणार असून सदर भरती परीक्षा जून 2021 मध्ये ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेले व पदवीच्या शेवटच्या वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेबाबत ऑनलाइन मार्गदर्शन करण्याकरिता तज्ञ मार्गदर्शकांची  मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केलेले आहेत या मार्गदर्शन वर्गांमध्ये सांख्यिकीय, अभियोग्यता,रिजनिंग, इंग्लिश व बँकिंग या विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्या युवकांना सदर भरती परीक्षा द्यायची आहे अशा युवक-युवतींनी महाविद्यालयातील  ऑनलाइन मार्गदर्शन वर्गासाठी २० मे २०२१ अखेर आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन केंद्र समन्वयक डॉ. विजय कुंभार, उपप्राचार्य डॉ.विठ्ठल सावंत व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.प्रतिभा गायकवाड यांनी केले आहे. अधिक माहिती करिता 02162-234729 व 9860176059 या नंबर वर संपर्क करावा. ऑनलाइन मार्गदर्शन वर्गाच्या प्रवेशाकरिता http://dgcc.rayatdc.com/DGCC/ या वेबसाईटवर अर्ज सादर करावा अशा प्रकारची माहिती प्राचार्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा यांनी दिलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा