![]() |
कालवश शीतल बाबर |
मालोजीराव माने/कार्यकारी संपादक :
जयसिंगपूर कॉलेजच्या कालवश शीतल (राज) बाबर यांच्या दुर्दैवी निधनानंतर कॉलेजचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक यांनी स्वयंस्फूर्तीने ₹ १ लाख ५८ हजार रुपयांची आर्थिक मदत शीतल बाबर यांच्या कुटुंबीयांना देऊ केली.
रविवार दि.११ एप्रिल २०२१ रोजी विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारा नम्र, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असणारा कर्मचारी शीतल बाबर याचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्या मृत्यूने कॉलेजमधील प्रत्येक घटक अस्वस्थ व भावनाविवश झाला होता. मुळात शीतल बाबर यांची आर्थिक परिस्थिती बेताची तसेच आई-वडील वृद्ध व आजारी असल्याने कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरती होती. परंतु काळाने त्याच्यावर घाला घालून हसऱ्या व प्रामाणिक तरुणाला आमच्यातून हिरावून नेले. अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र नैराश्यपूर्ण वातावरण होते.
कॉलेज घेतलेल्या शोकसभेत संस्थेचे चेअरमन डॉ.सुभाष अडदंडे व प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी बाबर यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी आवाहन केले. या केलेल्या आवाहनानुसार कॉलेजच्या सर्व सिनीयर, ज्युनिअर विभागातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक यांनी एकत्रित येऊन स्वयंस्फूर्तीने यथाशक्य होईल तेवढी मदत देऊ केली. या सर्वांची मिळून एकूण १ लाख ५८ हजार रुपयांची आर्थिक मदत संकलित झाली.
संकलित झालेली रक्कम शीतल बाबर यांच्या मातोश्रीच्या नावे खात्या वर पैसे जमा करण्यात आली आहे. कॉलेजच्या सर्व घटकांच्या आर्थिक मदतीमुळे खरोखरच बाबर कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. या अगोदरही एम.ए. अर्थशास्त्राचा अमोल कोरे नामक विद्यार्थी अपघाताने गंभीर जखमी असताना कॉलेज व्यवस्थापन समिती, प्राचार्य, प्राध्यापक ,प्रशासकीय कर्मचारी, NCC व इतर विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत केली होती.
कॉलेजचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक यांनी आर्थिक मदत करून दाखविलेल्या दातृत्वाचा सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा