ॲड.प्रविणकुमार माने/ उपसंपादक:
कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या अधिनियमानुसार पोलिस यंत्रणा अहोरात्रपणे कार्यरत आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व त्यांचे सर्व साथीदार कर्मचारी व होमगार्डस यांनी वेळोवेळी नागरिकांचे प्रबोधन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या कडक टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकावर पोलिसांनी आपली करडी नजर रोखून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.
मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून जयसिंगपूर पोलीसांनी शहरात विनाकारण रस्त्यावर अगर अन्यत्र फिरणाऱ्या लोकांची कसून चौकशी करणेत येऊन त्यांचे दुचाकी वाहन जप्त करण्यात येत आहे. याशिवाय अशा लोकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. यामुळे जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वत्र लॉक डाऊनला उत्तम प्रतिसाद मिळात असून शहरात लाॅकडाउनबाबत निश्चितच जागरूकता निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून ही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत चालली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा