Breaking

बुधवार, १९ मे, २०२१

"दिव्यांग तरुण प्रणव पवारने आजीच्या प्रेमापोटी व मानवतेच्या भावनेने कोविड सेंटर मधील रुग्णास स्वखर्चातून वितरीत केले दुग्धजन्य पदार्थ"



दिव्यांग तरूण प्रणव पवार कोव्हीड सेंटरला दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ वितरित करताना


गीता माने / उपसंपादक :

     उदगाव येथील कुंजवन सेंटर मधील रुग्णांसाठी दिव्यांग तरूण प्रणव पवार व त्याचे मित्र यांनी स्वखर्चातून ताक दही दुग्धजन्य पदार्थाचे वितरण करून मानवतेच्या भावनेला साथ दिली.

     जयसिंगपूरातील २३ वर्षीय दिव्यांग बंधू प्रणव पवारच्या आजीचे कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत निधन झाले होते त्यामुळे तो अस्वस्थ होता. त्याचबरोबर सर्वत्र या कोरोनामुळे हाहाकार माजून गरीब लोकांचे खूप हाल होताना त्याने पाहिलेला होतं. मुळात त्यांचा दूध व दुग्धजन्य पदार्थांचा विक्रीचा व्यवसाय हा देखील मंदीच्या सावटाखाली आहे.

         अशा लोकांना मदत करण्याच्या इच्छेने प्रणव अस्वस्थ झाला होता. शेवटी तो आणि त्याचे मित्र यांनी उदगाव येथील कोविड सेंटर मधील रुग्णांना दुग्ध व दुग्धजन्य पदार्थाचे वाटप करण्याचे ठरविले त्यानुसार त्यांनी या रुग्णांना सदर पदार्थांचे वाटप व्हावे म्हणून त्यांनी तेथील आचारी अनिल चिलाई व ओंकार शिंदे यांच्याकडे सुपूर्त केले. या माध्यमातून त्यांनी रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

      हे सामाजिक काम करण्यासाठी ची प्रेरणा त्याची आई सौ.करुणा पवार यांच्याकडून मिळाली. हे कार्य करण्यासाठी त्याचे मित्र धनंजय साळुंखे,निशांत पवार आदी मित्रांचे सहकार्य लाभलं.

      अत्यंत तरुणपणी सामाजिक भान असलेल्या या तरुणाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा