प्रा.अक्षय माने/ प्रमुख प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शिवाजी विद्यापीठ ऑनलाइन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करीत आहे. त्याचाच भाग म्हणून विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या दिनांक २५ मे पासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय निवडून विद्यापीठ संगणक प्रणालीत नोंदवण्यासाठीची मुदत १५ मे २०२१ पर्यंत होती. तथापि सदरची मुदत दिनांक १६ मे २०२१ रोजी रात्री १२.००पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा