जीवन आवळे/ प्रमुख प्रतिनिधी:
एक वर्षापासून देशात कोरोना महामारीने थैमान घातले असून त्याचा प्रत्येक क्षेत्रावर विपरीत परिणाम होत आहे त्याचाच एक परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर झाला आहे. सोन्या-चांदीच्या किंमती सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात उतरल्या असून घसरणीची प्रवृत्ती अजूनही चालू आहे.
तुमच्या घरी लग्नघाई असेल तर सोने-चांदी विकत घेण्याची सुवर्णसंधी असू शकते. सोन्याच्या दरातील घसरणीमुळे सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ५८४ रुपयांची वाढ झाली, तर चांदीचा दर प्रती किलो ₹ ३०३५ रुपयांनी वाढला आहे. दुसरीकडे सोने आणि चांदीच्या किंमतीत नेहमीपेक्षा मोठी घसरण झाली आहे.
यावर्षी आतापर्यंत सोने २७१८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. याउलट चांदी ३४५२ रुपयांनी महाग झाली आहे. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत ८७७० रुपयांनी स्वस्त झाली आहे. मागील वर्षाच्या उच्च किमतीच्या तुलनेत चांदी ₹५१७३ रुपयांनी स्वस्त झाली आहे. यावर्षी, सोन्याची गेल्या ३० वर्षांतील सर्वात वाईट स्थितीची सुरुवात झाली आहे. जानेवारी २०२० पासून सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यातील गुंतवणूक लाभदायक ठरणार आहे.
दुसरीकडे, मोतीलाल ओसवाल येथील संशोधन विभागाचे उपाध्यक्ष अमित सजेजा म्हणतात, “सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचे कारण म्हणजे डॉलरचा कमकुवतपणा.” गेल्या एका आठवड्यात अमेरिकन चलनात 0.80 ची घट झाली आहे. त्याचबरोबर एका महिन्यात हे 3 टक्क्यांनी कमी झाले आहे. अमित सजेजा म्हणतात की, येत्या काही वर्षांत डॉलर आणखी कमकुवत होईल, यामुळे अल्प मुदतीसाठी सोने चांगले गुंतवणूक माध्यम बनू शकेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा