Breaking

शनिवार, १५ मे, २०२१

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ होऊन; वारे १७५ किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता"




 प्रा.अक्षय माने / प्रमुख प्रतिनिधी :

    भारतीय हवामानशास्त्र विभाग नुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांचे अत्यंत तीव्र चक्रीवादळामध्ये रुपांतर होऊन प्रति तास १७५ किमी  वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

        अरबी समुद्रात तयार झालेल्या (taukte) तौकते या वादळाने अत्यंत तीव्र चक्रीवादळ मध्ये रुपांतर झाले असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हंटले आहे. यामुळे किनारपट्टी भागात ताशी १६०-१७५ किमी या वेगाने वारे वाहण्याची व जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रात हे चक्री वादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर असे गुजरातच्या दिशेने सरकत आहे. सध्या ते पणजी पासून अरबी समुद्रात ३०० किमी अंतरावर आहे. या वादळामुळे केरळ, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र किनारपट्टी भागात जोरदार वारे व पाऊस पडण्याची शक्यता आहे.

        केरळ मध्ये आज या वादळामुळे किनारपट्टी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे. हे वारे गुजरातला १८ मे ला सकाळी धडकणार असून या चक्री वादळाचा सर्वात जास्त फटका गुजरात राज्याला बसण्याची शक्यता आहे.या वादळाची दिशा उत्तर- उत्तर पश्चिम अशी असून हे वादळ जस जसे गुजरातकडे सरकेल तसे हे वादळ रौद्ररूप धारण करून चक्रीवादळ मध्ये रुपांतर होणार आहे. 

        महाराष्ट्रमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई मध्ये यामुळे जोरदार वारे व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.या चक्रीवादळाला "तौकते" (Tauktae) हे नाव म्यानमार या देशाने दिले आहे ज्याचा अर्थ "पाल" असा होतो.

     या वादळाचा सामना करण्यासाठी आणि मदतीसाठी NDRF जवानांच्या ५ तुकड्या ओरिसामधून गुजरातकडे रवाना झाल्या आहेत. या चक्री वादळाचा फटका कोरोना लसीकरण मोहिमेस बसला असून ज्यामुळे मुंबई मध्ये २ दिवस लसीकरण मोहीम बंद असणार आहे असे बीएमसी ने जाहीर केले आहे.

२ टिप्पण्या: