प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाभयंकर रूप धारण केल्यामुळे संपूर्ण जगात आहाकार माजला आहे. कोरोनामुळे सर्व व्यवस्था कोलमडून पडली असताना सर्वत्र जीव वाचविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ही आपापल्या परीने कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी शासन नियमांचा अनुकरण व लोकप्रतिनिधी मार्फत युद्धपातळीवर काम सुरू ठेवले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत १.रुग्णांची संख्या कमी करणे २. मृत्यूदरात वाढ होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील असताना दिसत आहेत.
मात्र शिरोळ तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या संभाजीपुर गावामध्ये वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोना व्याधीमुळे अवयव निकामी होऊन मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे अशा प्रकारची माहिती विविध वृत्तपत्रातून आलेली आहे. संभाजीपूर हे शिरोळ तालुक्यातील एक नामांकित ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास ९९% टक्के लोकसंख्या साक्षर व सुशिक्षित असून गावातील बहुतांशी लोक हे तृतीय क्षेत्रात अर्थात सेवाक्षेत्रात सर्वाधिक कार्यरत आहेत. सेवानिवृत्त झालेल्या नागरिकांची संख्या ही सर्वाधिक असून साहजिकच लोक देखील प्रत्येक गोष्टीविषयी लोक जागरूक असावेत असे मानले जाते.
मुळात संभाजीपुर या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने दिलेल्या माहितीनुसार, या गावात कोरोना साथीला थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने लॉकडाऊन पुकारण्यात आला, शासनाच्या सर्व नियमांचे पालन व्यवस्थितरित्या केले जाते. गावात जवळपास वय वर्ष 45 वरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर गावात एकूण ५ वार्ड करून एका समितीचे गठन करून त्या समितीच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची संख्या वाढवू नये तसेच गावात सर्वे करून योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे तसेच गावातील जास्तीत जास्त कोरोना तपासणी वाढल्यामुळे कदाचित कोरोना रिपोर्ट पॉझिटिव येत आहेत अशा प्रकारची त्यांनी माहिती दिली त्याच बरोबर एक दिवस आड या पद्धतीने रिक्षाद्वारे लोकांचे प्रबोधन करण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली.
मूळ प्रश्न असा आहे की, शिरोळ तालुक्यात सर्वाधिक कोरोना मृत्यूची संख्या संभाजीपूर या गावांमध्ये असेल तर संभाजीपुर ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत असे म्हणावे का? याला नेमके जबाबदार कोण? याविषयी गावांत व तालुक्यात खूप मोठी चर्चा सुरू आहे. गावातील नागरिकाच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अंतर्गत गटबाजी व राजकारणामुळे प्रत्येक पक्ष एकमेकाकडे बोट दाखवित आहे. तसेच गावातील नागरिकांनी ही प्रशासनाला सहकार्य केले नाही अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
काही ग्रामपंचायत सदस्यांनी कोरोना काळात नागरिकांसाठी अहोरात्रपणे कार्य केले आहे अशा प्रकारची माहिती मिळाली आहे. सुशिक्षितांची व आर्थिक संपन्न असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत व दानशूर व्यक्ती कडून कोव्हीड सेंटरची उभारणी होणे गरजेचं होतं परंतु याकडेही दुर्लक्ष झाल्याचे लक्षात येते.त्यामुळे वाढती कोरोना रुग्ण संख्या व मृत्यू दरातील घट रोखण्यासाठी तालुका प्रशासनांने यामध्ये वेळीच लक्ष घालून हा मृत्युदर रोखावा व लोकांचे आरोग्य सुरक्षित करावे अशी मागणी होताना दिसत आहे. शेवटी काय 'देर आये पर दुरुस्त आये' ही भूमिका असावी अशी अपेक्षा आहे.
सभाजीपुर ची ग्रामपंचायत करतीय काय? न
उत्तर द्याहटवासंभाजीपुरंची ग्रामपंचायत करतिय काय? जनेतेसाठी सुरलेक्षा देवू येत नसतील तर राजीनामा टाका सर्वांनी