गीता माने/सहसंपादक :
डॉ.श्रीधर तथा राजा दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या सदस्यपदी सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयातील प्रा.संजय ठिगळे यांची सदस्यपदी म्हणून नियुक्ती झाली असून या समितीचा कालावधी तीन वर्षाचा किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंतचा आहे.
प्रा.संजय ठिगळे हे सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेचे कार्यवाह असून त्यांनी लॉकडाऊनच्या काळात लिहीलेले 'अर्थभान' हे पुस्तक व 'कविता संजयच्या' हा कविता संग्रह प्रकाशित झाला असून त्यांच्या 'अर्थभान' या पुस्तकास राज प्रकाशन कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळीत कार्यरत असताना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न झालेल्या साहित्य संमेलनातील चर्चा सत्रात विविध विषयावर निमंत्रित व्याख्याते म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्याबरोबरच निमंत्रित कवींच्या कवी संमेलनात उत्तम पद्धतीने कविता सादर केल्या आहेत.
अलीकडेच ते ' माझं गाव कोरोनामुक्त गाव' या मोहिमेत सक्रिय झाले असून 'एकच टास्क, वापरा मास्क' हा उपक्रम राबवित असून ऑनलाईन पद्धतीने प्रसंगी गावोगावी जाऊन प्रबोधन करीत आहेत.
साहित्य क्षेत्राबरोबरच त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन व शिवाजी विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.त्यांच्या अभिनंदनीय निवडीबद्दल साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्याबरोबरच भारती विद्यापीठाचे अधिकारी,पदाधिकारी सहकारी प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.
त्यांच्या या निवडीने आनंदाचे वातावरण असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा