नवी दिल्ली : सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक बचत (Savings scheme) करणं फार महत्त्वाचं आहे. गरजेच्या वेळी ही बचतच उपयुक्त ठरते. कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी बचतीतले पैसे वापरता येतात. सुरक्षित आणि जोखीममुक्त बचतीसाठी पोस्टाच्या योजना उत्तम असतात. पोस्टाच्या अशाच एका योजनेबाबत आम्ही आपल्याला माहिती देत आहोत. या योजनेत आपण दररोज फक्त 95 रुपये जमा केल्यास 15 वर्षांनंतर आपल्याला किमान 14 लाख रुपये मिळतील. जाणून घेऊ या काय आहे ही योजना...
![]() |
जाहिरात प्रमोशन |
ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्ट जीवन विमा योजना : ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना बचत करणं खूप अवघड असते. कारण छोट्या खेड्यामध्ये बँकांचं प्रमाण खूप कमी असतं. अनेक लहान गावांमध्ये बँका नसतात. जवळच्या मोठ्या गावात बँक असते. अशा परिस्थितीत बचत करण्याची सुविधा देण्यासाठी भारतीय टपाल खात्यानं (Indian Post Office) ग्राम सुमंगल ग्रामीण टपाल जीवन विमा योजना (Gram Sumangal Post Life Insurance Scheme) सुरू केली आहे. यामध्ये दररोज फक्त 95 रुपये जमा करून तुम्ही मुदतीअंती 14 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवू शकता. याशिवाय मनीबॅकचा लाभही घेता येतो. त्यामुळे जितकी रक्कम गुंतवली आहे ती सगळी परत मिळते.
या योजनेत मॅच्युरिटी बोनस मिळेल : या योजनेत पॉलिसीधारकाला मॅच्युरिटी बोनसही (Maturity Bonus) मिळेल. या योजनेत आपण 15 वर्षं आणि 20 वर्षं अशा दोन कालावधीसाठी पैसे जमा करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदाराचं किमान वय 19 वर्षं आणि जास्तीत जास्त 45 वर्षं असावं.
ग्राम सुमंगल योजनेचे फायदे :
या योजनेत मनीबॅक सुविधादेखील उपलब्ध आहे. यामध्ये पॉलिसीधारकास 10 लाखांपर्यंतची विमा (Insurance) रक्कम मिळते. पॉलिसीची मुदत पूर्ण होईपर्यंत एखादी व्यक्ती जिवंत राहिली तर त्याला मनी बॅकचा फायदा होतो. तीन वेळा हा लाभ मिळतो. या अंतर्गत 15 वर्षांच्या पॉलिसीमध्ये सहा वर्षं, नऊ वर्षं आणि 12 वर्षं पूर्ण झाल्यावर 20-20 टक्के रक्कम परत मिळते. मुदतपूर्तीनंतर बोनससह उर्वरित 40 टक्के रक्कमदेखील दिली जाते.
एवढा भरावा लागेल हप्ता : एखादी व्यक्ती 25 वर्षांची असेल तर सात लाख रुपयांच्या रकमेसाठी 20 वर्षांच्या मुदतीकरिता दरमहा 2853 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच दररोज सुमारे 95 रुपयांची बचत करावी लागेल. वार्षिक प्रीमियम 32 हजार 735 रुपये असेल. सहा महिन्यांसाठी तो 16 हजार 715 रुपये आणि तीन महिन्यांसाठी 8 हजार 449 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा