अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या एका संशोधनातून दिलासादायक बाबी समोर आल्या आहेत. या संशोधनातून भारत बायोटेकनं तयार केलेली कोवॅक्सिन लस ही कोरोना व्हायरसच्या अल्फा आणि डेल्टा दोन्ही रुपांवर प्रभावी ठरत असल्याचं निष्पन्न झालं आहे. यासंदर्भात बोलताना एनआयएचनं सांगितलं की, ज्या लोकांनी कोवॅक्सिन लसीचा डोस घेतला होता, त्यांच्या रक्त्याच्या सॅम्पल्सवर दोन संशोधनं करण्यात आली होती. दोन्ही संशोधनांमधून निष्पन्न झालं की, या लसीमुळे शरीरात अधिक अॅन्टीबॉडी तयार होतात. ज्या B.1.17 अल्फा आणि B.1.617 डेल्टा व्हेरियंटला प्रभावीपणे निष्क्रीय करते. मिळालेल्या माहितीनुसार, कोवॅक्सिनमध्ये कोरोना व्हायरसच्या एका रुपाचा समावेश करण्यात आला आहे. जो व्हायरस विरोधात अँटिबॉडी तयार करण्यासाठी प्रतिरक्षा प्रणाली उत्तेजित करतो.
एनआयएचनं दिलेल्या माहितीनुसार, कोवॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची निरिक्षण सांगतात की, ही लस सुरक्षित आहे आणि कोरोनावर प्रभावीदेखील आहे. तसेच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा सुरक्षा अहवाल या वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा