रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रतिनिधी
टाकवडे येथील तुकाराम घाटगे यांच्या डेअरी फॉर्म मधून 150 किलोची भुकटी व घरफोडी केलेची फिर्याद शिरोळ पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे, सदर घटने बाबत आकाश काशिनाथ दवडे वय वर्ष 19 राहणार टाकवडे तालुका शिरोळ,तन्वीर शकील शेख वय वर्ष 21 राहणार टाकवडे तालुका शिरोळ,समीर फकरुदिन नदाफ वय वर्ष 20 राहणार टाकवडे तालुका शिरोळ या तिघांना सापळा रचून जांभळी परिसरातून शिरोळ गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे,त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यातील 25 किलोची 6 पोती असे 150 किलो दुधाची भुकटी किंमत 27 हजार रुपये व गुन्हा करताना वापरता आलेली ऑटो रिक्षा MH 08 I 9832 किंमत 60 हजार रुपये असा एकूण 87 हजार रुपये चा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.शैलेश बलकवडे पोलिस अधीक्षक सो कोल्हापूर मा जयश्री गायकवाड , अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी,रामेश्वर वैंजने उपविभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर,सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ सुळ, ज्ञानेश्वर सानप, हणमंत माळी,सुनील पाटील,ताहीर मुल्ला,गजानन कोष्टी,अभिजित परब,युवराज खरात यांचे पथकाने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा