Breaking

रविवार, ६ जून, २०२१

कोल्हापूर जिल्ह्यात निर्बंध कायम;जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रात्री उशिरा जाहीर केली नवीन नियमावली.




कोल्हापूर : राज्य शासनाच्या अनलॉक नियमावलीमध्ये कोल्हापूर चौथ्या गटात आहे. त्यामुळे संचारबंदी कायम राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिम व सलून या सेवा शनिवारी आणि रविवारी बंद राहतील. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई पास घ्यावा लागणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे.


हॉटेलमधील पार्सल सेवा सुरू राहणार आहे. सलून आणि जिम पन्नास टक्के आसन क्षमतेवर सुरू ठेवता येणार आहे; मात्र त्यात एसी वापरण्यास बंदी आहे. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ दरम्यान सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. ७ जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत हीच नियमावली राहील, असेही आदेशात म्हटले आहे.


या गोष्टी सुरू राहतील


  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सर्व दिवशी सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंत सुरू


  • वृत्तपत्रे, त्यांचे वितरण सुरूच राहणार


  • हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू


  • सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सोमवार ते शुक्रवार सकाळी ५ ते ९ सुरू राहतील, तर शनिवारी, रविवारी बंद.


  • शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील खासगी कार्यालयात फक्त २५ टक्के उपस्थिती


  • फक्त खुल्या मैदानावरील सराव सोमवार ते शुक्रवार दरम्यान पहाटे ५ ते सकाळी ९ या वेळेतच


  • राजकीय किंवा इतर बैठकांसाठी ५० टक्के क्षमतेची अट


  • कृषी कामे सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू राहतील


  • सलून आणि जिम ५० टक्के क्षमता सुरू राहील; पण एसीचा वापर नाही. (सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत)


  • बससेवा ५० टक्के आसन क्षमतेने सुरू


  • लग्न २५ लोकांच्या उपस्थितीतच


  • ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू


  • कामगार निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणीच बांधकाम सुरू



या सेवा बंद राहतील


  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने,सिनेमागृह, मॉल


  • सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम यांना संचारबंदीचे नियम लागू राहतील.


  • स्वतंत्र अलगीकरणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी तसेच गर्दी होणार नाही, अशा ठिकाणी चित्रीकरण फक्त सोमवार ते शुक्रवार दरम्यान, तसेच सायंकाळी पाचनंतर. (बाहेरचा प्रवास नाही.)

1 टिप्पणी:

  1. एसटी बस ने जिल्ह्या बाहेर जायला चालते आणि स्वतः ची गाडी घेऊन जाण्यासाठी ई पास काढायचा हा किती हास्यास्पद निर्णय आहे

    उत्तर द्याहटवा