रायगड : राजसदरेवरुन बोलतोय, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं पण आता मी गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 16 जून पासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले. रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली.
या व्यतिरिक्त 9 सप्टेंबर 2020 च्या आधी झालेल्या नियुक्त्या करुन टाका, याला सर्वोच्च न्यायालयाचा काही आक्षेप नाही. राज्याच्या हातात असलेली गोष्ट त्यांना द्यायला काय हरकत आहे. यामुळे जवळपास दोन हजार नियुक्त्या रखडल्या असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा