नवी दिल्ली : केरळमध्ये आज (३ जून) रोजी मान्सून दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासूनच दक्षिण - पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. केरळमध्ये यंदा मान्सून सामान्य परिस्थितीपेक्षा थोड्या उशिरानं दाखल झाला असल्याचं, भारतीय हवामान विज्ञान विभागाचं (IMD) म्हणणं आहे.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये येत्या २४ तासांत स्थिती मान्सूनसाठी अधिक अनुकूल होण्याचा पूर्वानुमान आहे. केरळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडतोय.
तुमच्या राज्यात कधी दाखल होणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून पुढे सरकत इतर राज्यांत या तारखांना दाखल होऊ शकतो...
केरळ : ३ जून
महाराष्ट्र : ११ जून
तेलंगणा : ११ जून
पश्चिम बंगाल : १२ जून
ओडिशा : १३ जून
झारखंड : १४ जून
बिहार आणि छत्तीसगड : १६ जून
उत्तराखंड - मध्य प्रदेश : २० जून
उत्तर प्रदेश : २३ जून
गुजरात : २६ जून
दिल्ली - हरयाणा : २७ जून
पंजाब : २८ जून
राजस्थान : २९ जून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा