कोल्हापूरः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रायगडावरून संभाजीराजेंनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर उद्यापासून कोल्हापूरात मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. खासदार संभाजीराजे यांनी आज शाहू समाधीस्थळावरुन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला तसंच उद्या होणाऱ्या आंदोलनाचा आढावा घेतला.
'कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. करोना नियमांचं पालन करुन सोशल डिस्टनसिंगचं व नियमांचे पालन करुन शांतपणे आंदोलन करु, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. तसंच, आंदोलनादरम्यान कोणीही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये. त्यांचा मान-सन्मान राखून त्यांच्याशी वागा,' असंही ते म्हणाले आहेत.
'१६ जूनला दहा ते एक या वेळेत उपोषण होणार असून कोल्हापुरात आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर पुढे प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे ५ जिल्ह्यात मूक आंदोलन होईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार व तेथील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येईल. आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक द्यायची. कारण ते आपल्यासाठी इथे येणार आहेत,' असं संभाजीराजेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा