Breaking

मंगळवार, १५ जून, २०२१

"राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त आई वृद्धाश्रमास संवेदनशीलतेची भेट"




 करण व्हावळ / जयसिंगपूर प्रमुख प्रतिनिधी :


     महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ,रुबाबदार, कार्यशील व्यक्तिमत्व, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष, हिंदुजननायक मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त राज साहेबांच्या उदंड आयुष्यासाठी दत्त प्रभूंच्या चरणी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आई वृद्धाश्रम,जयसिंगपूर  येथे नाष्टा, चहा व बिस्किट देण्यात आली.

      माई कला व साहित्य अकादमीचे संस्थापक अध्यक्ष तथा मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे व परिवारच्या वतीने २० वृद्धांना हा नाष्टा देण्यात आला.



यावेळी श्रीमती वसुमती दळवी,माई महिला ग्रुपच्या अध्यक्षा सौ.भक्ती जांभळे,सदस्या ऐश्वर्या शेट्टी,अकादमीचे सदस्य सचिन आडके,वैभव शेट्टी,मनसेचे धरणगुत्ती अध्यक्ष व पत्रकार रोहित जाधव,आई वृद्धाश्रमचे अध्यक्ष संजय भोसले,कन्या नारायणी जांभळे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा