![]() |
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली |
सांगली : जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने ३३ रुग्णालयातील कोविड रुग्णसेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी सोमवारी दिले. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये रुग्ण संख्या वाढल्यास पुन्हा ही रुग्णालये सुरू करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत कोविड रुग्णांची संख्या कमी होत आहे व रुग्णांसाठी उपलब्ध खाटांची संख्या आवश्यक प्रमाणात शिल्लक राहत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यातील ३३ रुग्णालयांना कोविड रुग्णसेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत व सद्य:स्थितीत रुग्णालयात दाखल रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर प्रशासनाकडून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविले असल्यास ते परत करावेत, विहित पध्दतीने रुग्णालयातील अंतर्गत व बा स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे इत्यादी बाबींची पूर्तता करूनच रुग्णालयातील कोविड रुग्णसेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ज्या रुग्णालयांना कोविड रुग्णसेवा बंद करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत ती रुग्णालये पुढीलप्रमाणे -उमा चॅरिटेबल हॉस्पिटल जत, कोविड-१९ हॉस्पिटल तासगाव, सद्गुरू हॉस्पिटल विटा, स्वस्तिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल शिराळा, श्रीनाथ आटपाडी, नूतन कवठेमहांकाळ, स्पंदन कडेगाव, मनमंदिर व जीवनधारा हॉस्पिटल विटा, मातोश्री खानापूर, छत्रपती शिवाजीराजे आळसंद, वेध हॉस्पिटल व पार्वती तासगाव, सदिच्छा आष्टा, ख्वाजा गरीब नवाज इस्लामपूर, मातोश्री कासेगांव, सहारा कोविड हॉस्पिटल इस्लामपूर, शिवगंगा पाटगांव, वाळवेकर व दुधणकर हॉस्पिटल सांगली, संजिवनी हॉस्पिटल कुपवाड, घाटगे हॉस्पिटल सांगली, सायना हेल्थ सेंटर सांगली, शिखरे, लाईफ केअर सांगली, नोबल हेल्थ सेंटर मिरज, श्वास हॉस्पिटल सांगली, भगवान महावीर सांगली, त्रिशला हॉस्पिटल सांगली, हेल्थ पॉईंट मिरज, शिवकृपा मिरज, न्यु लाईफ सांगली, नमराह सांगली आणि संस्कृती हॉस्पिटल सांगली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा