Breaking

शुक्रवार, २५ जून, २०२१

"बारावी कॉमर्स नंतर नेमक्या करिअरच्या कोणत्या संधी?"



      दहावीनंतर सायन्स स्ट्रीम (12th Science) घेणाऱ्या विद्यार्थ्यांनंतर कॉमर्स क्षेत्राचा (Commerce in 12th) नंबर लागतो. कॉमर्समध्येही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेश घेत असतात. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना कमी गुणांमुळे सायन्समध्ये प्रवेश मिळू शकत नाही म्हणून ते कॉमर्समध्ये आले असतात. बारावीनंतर कॉमर्समध्ये CA  (CA admissions) होण्याव्यतिरिक्त काहीच करिअर (Career in Commerce) नाही असं अनेकांना वाटत असतं. मात्र अजिबात नाही. बारावीनंतर कॉमर्समध्ये असे अनेक ग्रॅज्युएशन कोर्सेस (graduation courses in commerce)  आहेत ज्यामध्ये तुम्हाला करिअर करता येऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊया अशा काही कोर्सेसबदल.


कॉमर्समधील काही ग्रॅज्युएशन कोर्सेस


१. बी.कॉम- बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com)


२. बीबीए- बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (BBA)


३. बीकॉम (ऑनर्स) (B.Com) (Hons.)


४. अर्थशास्त्रात बीए (ऑनर्स) (BA (Hons.) in Economics)



५. इंटिग्रेटेड लॉ प्रोग्राम- बी.कॉम एल.एल.बी. (B.Com LL.B.)


६. इंटिग्रेटेड लॉ प्रोग्राम - बीबीए एलएल.बी (BBA LL.B)

     याशिवाय कॉमर्समध्ये बारावी झाल्यानंतर तुम्ही काहिओ प्रोफेशनल कोर्सेससुद्धा (Professional courses) करू शकता. हे कोर्सेस कोणते आहेत याबद्दल माहिती जाऊन घेऊया.


प्रोफेशनल कोर्सेस :


१. सीए- चार्टर्ड अकाउंटन्सी (CA)


२. सीएस- कंपनी सेक्रेटरी (CS)


३. बॅचलर इन फॉरेन लँग्वेज (Bachelor in Foreign Language)


४. डिझाईन कोर्सेस (Design Courses)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा