नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन पार पडला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षप्रमुख शरदचंद्रजी पवार यांनी आपले मनोगत मांडले.
- राष्ट्रवादी काँग्रेस मधील नवीन कर्तृत्ववान नेतृत्वामुळे मी पक्षाच्या भविष्याबद्दल निर्धास्त.
- महाविकास आघाडी सरकार पूर्ण वेळ टिकणार.
सलग 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत होता. त्यानंतर सत्तांतर झालं. आम्ही विरोधीपक्षात गेलो. या काळात अनेक मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केला. पण त्यामुळेच पक्षात अनेक नवीन नेतृत्व तयार झालं. याआधी त्यांचं कतृत्व कधी दिसलं नाही पण या आता ते जबाबदारीने आपलं काम करत आहेत. नवीन नेतृत्व तयार झाल्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, असा विश्वास पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी तमाम कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले.
आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी संघटना उभी करण्याची भूमिका स्वीकारली, ती कितपत योग्य होती याचा आढावा घ्यायचा आजचा दिवस आहे, असे शरद पवार म्हणाले. सत्ता ही केंद्रीत व्हायला नको. तसं झाल्यास ती भ्रष्ट होते. सत्ता अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला सत्तेचा भाग असल्याची जाणीव व्हायला हवी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वर्षांचा प्रवास पाहिल्यास, या पक्षानं महाराष्ट्रात मोठी नेतृत्वाची फळी निर्माण केली आहे, असं शरद पवार म्हणाले.
राज्यातील सरकार पाच वर्ष टिकेल - शिवसेना विश्वासू पक्ष आहे. त्यामुळे हे सरकार नक्कीच पाच वर्षे टिकेल. आपण महाविकास आघाडीचा पर्याय दिला, लोकांनी तो पर्याय स्वीकारला. आजच्या घडीला महाविकास आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा