Breaking

गुरुवार, १० जून, २०२१

" शिवाजी विद्यापीठ NSS कक्ष व इचलकरंजी NSS विभाग आयोजित ऑनलाईन व्याख्यानात कोरोनामुक्तीचा निर्धार ; डॉ. महावीर अक्कोळे"

 

प्रसिद्ध धन्वंतरी, डॉ.महावीर अक्कोळे


प्रा.अक्षय माने/ कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :


       कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 'माझं गाव कोरोनामुक्त गांव' ही मोहीम शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्ष व इचलकरंजी विभागाच्यावतीने   कोरोनामुक्तीचा निर्धार करून ऑनलाइन पद्धतीने जनजागृतीचे काम सातत्याने सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून इचलकरंजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या वतीने डॉ. महावीर अक्कोळे" या वैद्यकीय तज्ञांचे ऑनलाइन स्वरूपात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

    प्रारंभिक इचलकरंजी NSS विभाग प्रमुख व  नाईट कॉलेज, इचलकरंजीचे प्रा.डॉ.माधव मुंडकर यांनी या ऑनलाईन सत्रात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून या ऑनलाईन व्याख्यानाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना ते म्हणाले की, इचलकरंजी विभागातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता ऑनलाइन पद्धतीने जनजागृती करून या विभागातील दत्तक घेतलेली गावे कोरोनामुक्त होऊन सुरक्षित झाली पाहिजेत.यानंतर जयसिंगपूर कॉलजचे NSS कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी डॉ.महावीर अक्कोळे यांच्या कार्याची सांगोपांग पद्धतीने ओळख करून उपस्थित घटकांच्यामध्ये कोरोनामुक्तीसाठी सकारात्मक प्रेरणा निर्माण केली.

        प्रसिद्ध धन्वंतरी व सामाजिक कार्यकर्ते डॉ.महावीर अक्कोळे यांनी NSS कक्षाच्यावतीने व्हाट्सअँप ग्रुपद्वारे जनजागृती करणारे डिजिटल पोस्ट, व्हिडिओज व ऑनलाईन व्याख्यान या शिदोरीच्या माध्यमातून दत्तक गावे कोरोनामुक्त व भयमुक्तीसाठीच्या शिवाजी विद्यापीठाच्या या अभिनव मोहीमचे सुरुवातीस मनसोक्त कौतुक केले. त्यानंतर 'कोरोना काळात माझं कुटुंब माझी जबाबदारी' या विषयावर मौलिक मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने स्वतः व कुटुंबातील लोकांची जबाबदारीने काळजी घेतली तसेच तोंडाला योग्य पद्धतीने मास्क लावणे,हात साबणाने स्वच्छ धुणे किंवा हात सैनीटाइज करणे व गर्दी टाळून योग्य सामाजिक अंतराचे पालन करणे या त्रिसूत्रीचा प्रामाणिक व जबाबदारीने अनुकरण केल्यास व्यक्ती पर्यायाने प्रत्येक गांव कोरोनामुक्त होईल. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी तसा ठोस निर्धार करून दत्तक गावातील कोरोना दक्षता कमिटी व समस्त ग्रामस्थांनी याचं पालन करण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रेरित करावे. तसेच डॉ.अक्कोळे यांनी हे व्याख्यान अत्यंत साध्या,सोप्या व प्रबोधनात्मक पद्धतीने मांडले.

   

शि.वि.NSS,संचालक, प्रा.अभय जायभाये

यानंतर शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक व 'माझं गाव कोरोनामुक्त गांव' मोहिमेचे संकल्पक प्रा.अभय जायभाये अध्यक्षीय भाष्य करताना म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक गांव कोरोनामुक्त करण्याचा  शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.डॉ.डी.टी. शिर्के यांचा संकल्प असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कक्ष कार्य करीत आहे.जोपर्यंत प्रत्येक गाव पूर्णत: कोरोनामुक्त होणार नाही तोपर्यंत शिवाजी विद्यापीठाची ही मोहीम मानवतावादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून समाजहित विचारात घेऊन मनुष्यहानी टाळण्यासाठी सदैव विविध माध्यमातून तत्पर राहणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक विद्यार्थी सातत्याने काम करीत असून कोरोनामुक्तीची ही लढाई अशीच चालू राहणार आहे.


      या ऑनलाईन व्याख्यानाचा आभार प्रदर्शन राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडीचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. गिरीश मोरे यांनी सकारात्मक विचार देणारे व उत्साह निर्माण करणाऱ्या शब्दांकनातून अप्रतिम पद्धतीने व्यक्त केले. या कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन व उत्तम सूत्रसंचालन प्रा.सौरभ पाटणकर यांनी केले.



      सदर व्याख्यानात दत्तक गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, तलाठी,ग्रामसेवक,पोलीस पाटील, कोरोना दक्षता कमिटी व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर इचलकरंजी विभागातील सर्व कार्यक्रम अधिकारी यांनी उत्तम नियोजन  व सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी केला.

     'माझं गाव कोरोनामुक्त गाव' या मोहिमे अंतर्गत आयोजित या व्याख्यानाचे दत्तक गावातील सर्व ग्रामस्थांकडून कौतुक होताना दिसत आहे.

1 टिप्पणी: