Breaking

मंगळवार, १ जून, २०२१

"उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांची जांभळीतील ऑक्सिजन पार्कला भेट, मदतीचे आश्वासन आणि त्वरित आश्वासनाची अंमलबजावणी"

 

उद्यान पंडित गणपतराव पाटील

प्रा. मेहबूब मुजावर : प्रमुख प्रतिनिधी

       जांभळी येथील ऑक्सीजन पार्कला उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांनी सदिच्छा भेट देऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

     शिरोळ तालुक्यातील  जांभळी येथील निसर्ग प्रेमाने भारावलेल्या आम्ही जांभळीकर ग्रुपच्या प्रयत्नाने ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली.हा ग्रुप 'आता नावासाठी नाही.... फक्त गावासाठी' हे ब्रीद उराशी बाळगून अल्पकाळात अहोरात्र प्रयत्न करून विविध देशी वृक्षांची रोपण करून जैवविविधता निर्माण करण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण करीत आहे. 

       चार एकरामध्ये बाराशे विविध प्रकारची देशी झाडे लावण्यात आली असून हा ऑक्सीजन पार्क अजून सहा एकर जागेत करण्यात येत आहे.या ऑक्सिजन पार्क विषयीची आस्था व गावातील एकजुटीची महती व प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील इतर गावात त्यांच्या सहकार्याने ऑक्सीजन पार्कची निर्मिती करीत आहेत हे कौतुकास्पद आहेच. 

      मा.गणपतराव पाटील दादा यांनी आपल्या गावाशी असलेले ऋणानुबंध व प्रेमापोटी सदिच्छा भेट देऊन येथील तरुणाईचं मनसोक्त कौतुक केलं. त्याचबरोबर ऑक्सिजन पार्कच्या पूर्णत्वासाठी सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि तातडीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून बोर मारून दिला. तसेच इतर प्रश्न सोडवण्यासाठी बीडीओ ऑफिसर शंकर कवितके यांच्याशी सविस्तर चर्चा ही केली.   

       तसेच या ऑक्सिजन पार्कच्या अन्य प्रश्नांसाठी शिरोळ पंचायत समिती सदस्य संजय माने व दत्त सहकारी साखर कारखान्याचे, संचालक शेखर पाटील यांचे ही अमूल्य सहकार्य लाभले आहे.

    खरंच जांभळी येथील ऑक्सीजन पार्कची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. निसर्ग संवर्धनासाठी आम्ही जांभळीकर ग्रुपने उचललेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद असून इतर गावांनीही त्याचा आदर्श घ्यावा असे त्यांचे कार्य आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा