Breaking

मंगळवार, १ जून, २०२१

"शिरोळ शहरात अहिल्याबाई होळकर जयंतीच्या निमित्ताने ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन व वृक्षारोपण करून अभिवादन"



 गणेश कुरले : धरणगुत्ती प्रमुख प्रतिनिधी

     शिरोळमध्ये अहिल्यादेवी होळकर तरुण मंडळाच्या वतीने ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन व वृक्षारोपण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या राजमातेस समाज बांधवांकडून  अभिनव पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

     सुरुवातीस शिरोळचे नगरसेवक योगेश पुजारी व सौ.सुरेखा पुजारी यांच्या उपस्थितीत नियमांचे काटेकोर पालन करून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन पार पाडले. सदर प्रसंगी गावातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

    खरं म्हणजे ३१ मे हा दिवस धनगर समाज बांधवांच्या दृष्टीने आनंदमय, उत्साहाचा व प्रेरणा दिवस असतो. या दिवशी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कार्यक्रम असतो. मात्र कोरोना महामारीमुळे सर्वत्र नैराश्यपूर्ण व अस्वस्थ करणारं वातावरण आहे. यामुळे जयंती साजरी करणे कठीण होतं अशा वेळी मंडळातील सर्व सदस्यांच्या एक मताने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस राज्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. तसेच राष्ट्रसेवा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मंडळ सातत्याने विविध उपक्रमाचे आयोजन करीत असते. त्याचाच भाग म्हणून आजच्या दिवशी वृक्षारोपण ही करण्यात आले.

         या तरुण मंडळाने घेतलेल्या ऑनलाईन  वक्तृत्व स्पर्धा व केलेले वृक्षारोपण यामुळे या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा