Breaking

गुरुवार, १० जून, २०२१

"कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या संख्येत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल"

 



प्रा. अक्षय माने /कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :


    मार्च २०२० पासून सुरू असलेल्या कोरोनाचा कहर थांबता थांबेना त्यामुळे संपूर्ण राज्य कोरोना साथीने त्रस्त झालेले आहे. अशातच दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना साथीने पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातला त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर,सांगली व सातारा या जिल्ह्यात रुग्णसंख्या व कोरोनामुळे मयत होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली.

     मात्र महाराष्ट्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमानुसार व लॉक डॉऊनमुळे तसेच शिवाजी विद्यापीठाचे 'माझं गाव कोरोनामुक्त गाव' या मोहिमेच्या कोरोनामुक्तीच्या जागरामुळे ही कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात अंशता प्रभाव झालेला दिसून येत आहे. सरकारचे धोरण, प्रशासनाचे उत्तम काम,पोलीस प्रशासनाने केलेली प्रामाणिक सेवा व जनतेच्या सहकार्यामुळे राज्यातील बराच भाग कोरोना मुक्तीकडे किंबहुना कोरोना साथ थांबविण्यामध्ये यशस्वी होताना दिसत आहे.

       मात्र कोल्हापूर जिल्ह्याची मृत्यू संख्या जवळपास ४ हजारावर पोहोचली असून सर्वात दुर्देवी म्हणजे कोरोनामुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू संख्येची नोंद कोल्हापूर जिल्ह्यात झाली आहे. राज्यात दिवसभरात एकूण २६१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात ३१ रुग्ण मयत आहेत. महाराष्ट्रातील ११.८४ टक्के मृत्यू एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहेत.

        जिल्ह्यात २ महिन्यात बाधित रुग्णांची संख्या वाढत असून त्यामध्ये गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. परंतु गेल्या आठवडाभरात कोरोना मुक्तीचा आकडा दिलासादायक आहे. यापुढेही नागरिकांनी जबाबदारीने कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी दक्ष राहिले तर कोल्हापूर जिल्हा ही कोरोना मुक्तीकडे वाटचाल करेल यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा