Breaking

मंगळवार, ८ जून, २०२१

"शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचण आलेल्या विद्यार्थ्यांनी माहिती सादर व ऑनलाईन परीक्षेची शेवटची संधी: परीक्षा संचालक गजानन पळसे"

 

प्रभारी परीक्षा संचालक, श्री.गजानन पळसे


प्रा.अक्षय माने/ कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :


 शिवाजी विद्यापीठाने कोरोना साथीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन  परीक्षा कामासंदर्भात आत्तापर्यंत परिस्थितीनुसार अत्यंत उत्तम व उचित कार्यवाही केलेली आहे. तदनुसार शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचण आलेल्या विद्यार्थ्यांनी माहिती सादर करावी तसेच अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेची शेवटची संधी दिली जाणार असल्याची माहिती प्रभारी परीक्षा संचालक मा.गजानन पळसे यांनी दिली आहे.

       विद्यापीठाच्या संदर्भीय पत्र क्रमांक ८/६/२०२१ नुसार ऑक्टो/ नोव्हें २०२० हिवाळी सत्राच्या विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षेमधील ऑनलाइन परीक्षा देताना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या परीक्षार्थींची covid-19 साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर शेवटची संधी म्हणून फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. 

    तसेच उपरोक्त कारणास्तव जे विद्यार्थी परीक्षेत बसणार आहेत त्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेल्या खालील लिंकवर जावून परीक्षेबाबतची माहिती रविवार दि.१३/६/२०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत भरण्यात यावी. जे विद्यार्थी आवश्यक माहिती भरतील अशा विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल व सदरचा निकाल अंतिम राहील याची नोंद घ्यावी. तद्नंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.   

             Web Page ➡️ online.unishivaji.ac.in

                       ➡️ Winter 2020 Imp links for students

          Link ➡️ Re-examination Application Form for                        Technical Problem and other issue

        तसेच संबंधित अधिविभाग/ महाविद्यालयाने ऑनलाइन परीक्षा देताना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक मधून माहिती सादर करण्यासाठी आपले स्तरावरून अवगत करण्यात यावे.

     अशी प्रकारची माहिती शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभाग प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.


(टिप - अधिकार मंडळाच्या निर्णयानुसार(Egineering,Pharmacy, Architecture,Law, Education & M.B.A.) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या तसेच अधिविभाग व प्रथम वर्ष महाविद्यालय स्तरावर परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी वरील लिंक मध्ये नोंदी करू नयेत)

( सदर लिंक बाबतीतील तांत्रिक अडचणीसाठी संपर्क क्र. ०२३१ - २६०९३३५)

1 टिप्पणी: