Breaking

मंगळवार, ८ जून, २०२१

"कोल्हापूर शहरात 'चेंबर ऑफ कॉमर्सचा 'निर्णय; सर्व जीवनावश्यक वस्तूंची विक्री व अत्यावश्यक सेवा उद्या दु.१२पर्यंत बंद"

 



    कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या ४३ संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या सांगोपांग चर्चेच्या अंतिम निर्णयानुसार कोल्हापूर शहरातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री व अत्यावश्यक सेवा उद्या ९जूनला दु.१२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

      शासनाच्या लॉकडाऊन धोरणामुळे व्यापारी व उद्योजकांचे अर्थचक्र कोलमडल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या  धोरणामुळे व्यापाऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्यामुळे प्रशासनाच्या आणि सरकारच्या अनाठायी निर्बंध व धोरणा विरोधात व्यापारांनी आक्रमक भूमिका घेतली. दुकान उघडण्यास परवानगी द्या, अशीही मागणी आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

    संघटनेचे प्रतिनिधी शेटे यांनी उद्या ९ जूनला सकाळी १० ते दुपारी १२ या कालावधीमध्ये सर्व व्यापारी वर्गानी सर्व व्यवसाय बंद ठेवून आपल्या दुकानासमोर हातात फलक धरून उभे राहतील. सरसकट सर्वच दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळावी, ही मागणी सरकारपर्यंत पोहचण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. 

      या आंदोलनामध्ये किराणा भुसारी, किरकोळ किराणा दुकानदार, कंझ्युमर्स असोसिएशन, उत्पादक विक्रेते, ग्रेन मर्चंट असोसिएशन व  मेडिकल दुकानदार असोसिएशन यांचाही सहभाग असणार आहे. या आंदोलनामुळे उद्या सकाळी ७ वाजता उघडणारी दुकाने दुपारी १२ ते ४ याच दरम्यान उघडी राहणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा